
लोकलमध्ये महिलांची झिंज्या ओढत भयंकर हाणामारी
फ्री स्टाईल हाणामारीचा व्हिडीओ जोरदार व्हायरल, नेटक-यांच्या मजेशीर प्रतिक्रिया
मुंबई – मुंबई लोकल ही मुंबईची लाईफलाईन समजली जाते. पण अनेकदा या लोकलमध्ये जागेवरून हाणामारी झाल्याचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. खासकरुन महिलांच्या डब्यातील व्हिडीओ यात जास्त आहेत. आताही असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यात महिलांनी चक्क एकमेकांच्या झिंज्या धरत फ्री स्टाईल हाणामारी केली आहे.
व्हायरल होत असलेला व्हिडिओ विरार लोकलमधील असल्याचे बोलले जात आहे. व्हिडीओत दिसत आहे की, लोकलमधील महिलांच्या डब्यामध्ये मोठी गर्दी होती. अशातच महिलांच्या डब्यामध्ये काही महिलांमध्ये कोणत्यातरी मुद्दयावर वाद होण्यास सुरुवात होते,काही वेळाने हा वाद चक्क हाणामारीवर येतो. यावेळी एक महिला आक्रमक होत दुस-या महिलेच्या झिंज्या ओढत बेदम मारहाण करते. सुरूवातीला कोणीही त्यांचे वाद सोडवण्यासाठी येत नाही. पण काहीवेळाने महिला त्यांचा वाद सोडवण्यासाठी पुढे येतात अणि वाद सोडवतात. महिलांच्या हाणामाराची व्हिडिओ सध्या इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत असून तो इन्स्टाग्रामच्या ”patlancha_nianad” या अकाउंटवर व्हिडिओ पोस्ट करण्यात आलेला आहे. व्हायरल होत असलेला व्हिडिओ विरार लोकलमधील असल्याचे समजत असून व्हिडिओतील मारामारी पाहून नेटकऱ्यांनी अनेक प्रतिक्रिया दिल्या आहेत.
प्रवाशांनी गर्दीमुळे चर्चेत असलेली मुंबई लोकल नेहमीच वेगळ्याच कारणांमुळे चर्चेत येत असते. लोकलसेवा ही मुंबईची जीवनवाहिनी आहे. या लोकलमधून लाखो नागरिक हे रोज प्रवास करत असतात. पण मुंबई लोकलमधील भांडणाचे आणि मारामारीचे सत्र वाढतच चालले आहे.