Latest Marathi News
Ganesh J GIF

भयंकर! राहुलचा सीमा नाही तर सीमाच्या अल्पवयीन मुलीवर होता डोळा

सीमाच्या हत्याकांडात नवीन अँगल समोर, प्रियकर राहुलने या कारणामुळे केली सीमाची हत्या

अंबरनाथ- अंबरनाथ पूर्व आणि पश्चिम भागाला जोडणाऱ्या ब्रिजवर प्रेम प्रकरणातून प्रियकरानेच सीमा कांबळे यांची हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली होती. पोलिसांनी आरोपी प्रियकराला अटक केली आहे. पण आता या प्रकरणी नवीन खुलासा समोर आला आहे.

सीमा कांबळे आणि राहुल भिंगारकर यांचे सहा वर्षांपासून प्रेमसंबंध होते. सीमाने राहुलला उसने पैसे दिले होते. मात्र, तिच्याकडून पैसे परत करण्यासाठी तगादा लावला जात होता. ‘उसने दिलेले पैसे परत दे नाहीतर माझ्याशी लग्न कर’ असा तगादा लावला होता, त्यातूनच हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज होता. पण आता एक नवीन अँगल समोर आला आहे. राहुल सीमाच्या घरी येत होता, पण त्याचा डोळा सीमाच्या १३ वर्षांच्या मुलीवर देखील होता, अशी धक्कादायक बाब आता समोर आली आहे. सीमा राहुलशी लग्न करणार असल्याची कुणकुण लागल्याने सीमा आणि राहुलची आई या दोघींमध्ये नेहमीच वाद होत होते. ‘राहुल सीमासोबत लग्न करणार नाही, तुझ्या मुलीसोबत लग्न करेल’ अशा धमक्या राहुलची आई सीमाला देत होती. राहुल लग्न करणार नसल्यामुळे ‘माझे दिलेले पैसे परत दे’ असा तगादा सीमाने लावला. सीमाच्या बहिणीने ‘तो लग्न करत नसेल तर त्याच्याकडून पैसे घे आणि विषय सोडून दे’ असा सल्ला सीमाला दिला होता. घटनेच्या दिवशी राहुलने सीमाला फोन करून तुझे पैसे देऊन टाकतो असे म्हणाला. मग ठरलेल्या ठिकाणी भेटीसाठी सीमा पैसे घेण्यासाठी अंबरनाथ स्टेशन परिसरात गेली. त्यानंतर दोघेही अंबरनाथ रेल्वे स्टेशन परिसरातून पायी चालत अंबरनाथ पूर्व पश्चिमेला जोडणाऱ्या ब्रिजकडे गेले. यावेळी पुन्हा दोघात वाद झाला. या वादातून राहुलने सीमाची हत्या केली.

राहुलने सीमावर धारदार शस्त्राने भर दिवसा सपासप वार केले. या हल्ल्यात सीमा रक्ताच्या थारोळ्यात पडली. सीमाला जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तिला उपचारादरम्यान मृत घोषित केले. पोलिसांनी राहुलला अटक केली असून धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. पोलीस पुढील तपास करत आहेत.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!