Latest Marathi News
Ganesh J GIF

पुण्यात थार चालकाने सहा सात दुचाकींना धडक देऊन पळ काढला

अपघाताचा थरार सीसीटीव्हीत कैद, पळ काढणाऱ्या थार चालकाला अटक, चालक दारूच्या नशेत?

पुणे – पुण्यातील कोथरुड परिसरात एका थार वाहनचालकाने पाच ते सहा वाहनांना जोरदार धडक दिली. या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र, दुचाकी वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. या अपघाताचा भयानक थरार सीसीटीव्हीत कैद झाला आहे.

हृषीकेश सुंदर पुजारी असे ताब्यात केलेल्या कार चालकाचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शनिवारी रात्री हृषीकेश पुजारी हा थार गाडीतून कोथरुड परिसरातून सिटी प्राईडकडे निघाला होता. सिटी प्राईड परिसरात आल्यानंतर त्याचे गाडीवरील नियंत्रण सुटले त्यामुळे रस्त्याच्या कडेला पार्क केलेल्या सुमारे पाच-सहा दुचाकीला धडक देत गाडी पुढे गेली. सुदैवाने पार्किंग केलेल्या दुचाकीनवर कोणी नव्हते म्हणून जीवितहानी टळली. अपघात घडल्यानंतर थार मालक त्याच्या गाडीसह तिथून निघून गेला. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला होता. त्यामुळे पोलीसांनी त्या आधारे चालकाचा शोध घेतला. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत गुन्हा दाखल केला. काही नागरिकांनी त्याच्या गाडीचा नंबर पाहिला असल्याने गाडीच्या नंबरवरून पोलिसांनी रविवारी सकाळी त्याचे घर गाठले व घरून हृषीकेश सुंदर पुजारी याला ताब्यात घेतले. ऋषी पुजारी हे गार्डन कोर्ट हॉटेलचे मालक असून, त्यांच्या वाहनाच्या काचा काळ्या केल्या आहेत, हा देखील एक गुन्हा आहे. त्याने मद्दप्राशन करून गाडी चालविली होती का? याचा तपास करण्यासाठी त्याची ससूनमध्ये वैद्यकीय चाचणी करण्यात आली आहे. अद्याप चाचणीचा अहवाल आला नसून चाचणी अहवाल आल्यानंतर नेमका अपघात कशामुळे झाला हे स्पष्ट होणार आहे.

 

अलीकडच्या काळात अशा घटना वाढत चालल्या आहेत. वाहन चालकांकडून वेगमर्यादा, वाहतूक नियमांचं उल्लंघन हे शहरात रोजचेच झाले आहे. त्यातच मोबाईल वापर, अल्कोहोल सेवन आणि निष्काळजीपणा यामुळे अनेक निरपराध नागरिकांचे जीव धोक्यात येत आहेत. कल्याणीनगरमध्ये अशाच अपघातामुळे दोघांना आपला जीव गमावावा लागला होता.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!