
पाहुण्यांसमोर नवरीने केला असा डान्स की सगळे…
नवरीच्या डान्सचा व्हिडिओ सोशल मिडीयावर तुफान व्हायरल, नवरदेवही लाजला, काय झाले बघाच
मुंबई – आता आपल्याकडील लग्न डान्स शिवाय अपूर्ण आहेत. मिरवणूक असो किंवा वधू-वराची एंट्री डान्स केला जातो. कधी कधी तर नवीन नवरा नवरीदेखील डान्स करताना दिसतात. आजकाल नववधूही त्यांच्यात लग्नात भन्नाट नाचताना दिसतात. असाच एक व्हिडीओ सध्या समोर आला आहे.
लग्न म्हणजे फक्त दोन जीवांचा मिलन नसून दोन कुटुंबांचं एकत्र येणं असंत. मात्र, गेल्या काही वर्षांत लग्नाचं स्वरूप मोठ्या प्रमाणात बदलले आहे. लग्नात काही क्षण मजेशीर तर काही भावुक असतात. कधी नवरा-नवरी आनंदाने हसताना दिसतात तर कधी त्यांनी पाहिलेलं स्वप्न प्रत्यक्षात साकार होताना पाहून त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रूही येतात. कारण लग्न म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यातील एक खास, महत्त्वाचा असा क्षण असतो आणि हा क्षण फक्त नवरा-नवरीच नव्हे तर सर्वांच्या कायम लक्षात राहावा यासाठी प्रयत्न केले जातात. वैवाहिक आयुष्याची सुरूवात करताना लग्नाच्या दिवशी अनेक नवरा-नवरी कपल्स डान्स करताना दिसतात. अशाच एका नवरीचा डान्सचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. लग्नात नवरीनं आपल्या नवऱ्यासाठी तुफान डान्स केला आहे. नवरीने “खंडोबाला नवस केला लाखात एक पोरगा भेटू दे मला” या मराठी गाण्यावर भन्नाट डान्स केला आहे. यावेळी नवरदेवही स्टेजवर उभा आहे.यावेळी नवरीचा डान्स पाहून नवरदेवही खूश होऊन लाजताना दिसतोय. यावेळी नवरीच्या बहिणींनी नवरदेवाला नाचण्यासाठी बोलावलं असतानाही नवरदेव लाजताना दिसत आहे. सध्या हा भन्नाट व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.
सोशल मीडियावर हा व्हिडीओ nanditashisatkar_01 नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओवर नेटकरी वेगवेगळ्या मजेशीर प्रतिक्रिया देत आहेत. अनेकांनी नवरीचे काैतुक केले आहे तर काहींनी अशीच बायको मिळावी अशी इच्छा व्यक्त केली आहे.