
लग्नात नवरीने असे काही केले की सगळे पाहतच राहिले
नवरीच्या अनोख्या अंदाजाचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल, नवरीची कृती एकदा बघाच!
जळगाव – लग्न आणि त्यातील वेगवेगळ्या क्षणांचे व्हायरल होणारे व्हिडिओ असे आता एक हमखास समीकरणच बनले आहे. आता नवरा नवरीच्या एंट्री देखील पहिल्यासारख्या साध्या राहिल्यानसून अतिशय अनोख्या पद्धतीने होत आहेत. सध्या अशाच एका नवरीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
लग्नात नवरा-नवरीच्या एन्ट्रीच्या बाबतीत पूर्वीपेक्षा बरेच बदल झाले आहेत. आता नवरा नवरीचा हात पकडत किंवा नवरी लाजत मान खाली घालून चालत प्रवेश करत नाहीत. लग्न कसेही असो नवरी आकर्षक पद्धतीनेच मंडपत येते. व्हायरल होत असलेल्या नवरीने मैत्रीणींसोबत लग्नात हलगीच्या तालावर ठेका धरत जबरदस्त अशी एन्ट्री घेतली आहे. नवरीनं केलेला डान्स सगळ्यांचंच लक्ष वेधून घेत होता. आता नवरीचा आनंद देखील काैतुकाचा विषय आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर shital_makeover_1514 या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला लाखोंमध्ये व्ह्यूज मिळाले आहेत. तर नेटकरीही वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. खान्देश आपल्या अहिराणी भाषा आणि अनोख्या नृत्यामुळे ओळखला जातो. नवरीने आपल्या नृत्यात नेमका अशाच पद्धतीने डान्स केला आहे. त्यामुळे अनेकांनी नवरीचे भरपूर काैतुक केले आहे.
आता केवळ नव-याचे मित्रच नव्हे नवरीच्या मैत्रिणी लग्नात मनसोक्त नाचतात. वराची मिरवणूक वधूच्या दारात पोहोचल्यावर सर्वजण नाचताना दिसतात. पण आजकाल नववधूही त्यांच्यात लग्नात भन्नाट नाचताना दिसतात. त्यामुळे असे अनोखा अंदाज असणारे व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहेत.