
मंडपात नवरीने नवरदेवाचा हात धरत केले असे काही…
नवरा नवरीचा व्हिडिओ सोशल मिडीयावर जोरदार व्हायरल, पाहुणेही झाले थक्क, एकदा बघाच
पुणे – लग्न म्हणजे आयुष्यातला सर्वात सुंदर दिवस. हा दिवस अविस्मरणीय करण्यासाठी प्रत्येकजण प्रयत्न करत असतो. त्यात सध्या लग्नात वऱ्हाडी मंडळींसोबतच नवरा-नवरींनी डान्स करायचाही ट्रेन्ड आला आहे. सध्या सोशल मिडीयावर असाच एका नवीन जोडप्याचा डान्स व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे.
लग्न म्हणजे फक्त दोन जीवांचा मिलन नसून दोन कुटुंबांचं एकत्र येणं असंत. मात्र, गेल्या काही वर्षांत लग्नाचं स्वरूप मोठ्या प्रमाणात बदलले आहे. पारंपरिक विधींसोबतच आता लग्नात एंटरटेनमेंट, डान्स, रील्स, फोटोशूट आणि हटके एंट्री याला महत्व आले आहे. सध्या सोशल मीडियावर एका नवरदेव आणि नवरीचा व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे. या दोघांनी लग्नाच्या मांडवात चक्क डान्स केल्यामुळे पाहुणे देखील थक्क झाले. व्हिडीओमध्ये पाहू शकता की, संपूर्ण लग्नाचा हॉल पाहुण्यांनी भरलेला आहे. याच पाहुण्यांसमोर नवरा-नवरीनं हलगीच्या तालावर ठेका धरत जबरदस्त असा डान्स केला आहे. नवरीने नवरदेवाचा हात धरत थेट मांडवात डान्स करायला सुरुवात केली. नवरदेवही मागे न राहता तिला साथ देतो. या दोघांचा ट्युनिंग, एनर्जी आणि स्मितहास्याने सगळे पाहुणे अक्षरशः फिदा झाले. काहीजणांनी टाळ्या वाजवल्या, काहींनी मोबाइलमध्ये तो क्षण कैद केला. सोशल मीडियावर हा व्हिडीओmarathi_royal_karbhar नावाच्या इनस्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. यावर आता नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.
वैवाहिक आयुष्याची सुरूवात करताना लग्नाच्या दिवशी अनेक नवरा-नवरी कपल्स डान्स करताना दिसतात. सध्या हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत असून अनेकांनी दोघांचे खासकरुन नवरीचे काैतुक केले आहे. अनेकांनी दोघांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देखील दिल्या आहेत.