Latest Marathi News
Ganesh J GIF

भरमंडपात नवरीचा अचानक लग्नाला नकार म्हणाली…

नवरीच्या नकाराचा व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल, फोन आला आणि लग्नच मोडले, नेमक काय घडलं

बेंगलोर – लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्वाचा टप्पा असतो. आयुष्याभराची साथ देण्यासाठी जोडीदार निवडले जातात. पण कधी कधी लग्नात सुद्धा अनेक धक्कादायक घटना घडत असतात. बेंगलोरमध्ये मात्र एक धक्कादायक विचित्र घटना घडल्याने खळबळ उडाली आहे.

कर्नाटकातील हसन जिल्ह्यातील बुवनहल्ली गावात चित्रपटाच्या कथानकाला लाजवणारी घटना समोर आली आहे. कारण एका नवरीने एैन लग्नात लग्न करण्यास नकार दिल्याची घटना समोर आली आहे. पल्लवी नावाच्या मुलीचे लग्न अलूर तालुक्यातील रहिवासी वेणुगोपालशी निश्चित झाले होते. लग्नाचा दिवस येईपर्यंत सर्व काही ठिक होते. लग्नाच्या विधीपर्यंतही सर्व ठीक होते. मात्र जेव्हा वर मंगळसूत्र हातात घेऊन गळ्यात घालणार तितक्यात ती लग्नाला नकार देते. आपल्याला हे लग्न करायचं नाही असं तिने स्पष्ट पणे सांगितलं. शिवाय आपलं दुसऱ्या मुलावर प्रेम असल्याचं ही तिने सांगितलं. मुलगी लग्नाला तयार नसेल तर आपण लग्न करणार नाही असं नवऱ्या मुलाने ही सांगितलं. आणि त्यामुखे सर्वत्र शांतता पसरते. मुलीच्या पालकांनी तिला समजावण्याचा खूप प्रयत्न केला, नातेवाईकांनीही आपापल्या पद्धतीने तिला समजावण्याचा प्रयत्न केला, पण पल्लवीने कुणाचेही काही ऐकले नाही. हे सर्व होत असताना मुलीचा बॉयफ्रेड लग्न मंडपात पोलिसांना घेलून पोहोचला. त्यानंतर नवरीचा हात पकडून तो लग्न मंडपातूनच तिला घेवून गेला. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून व्हिडीओची सोशल मीडियावर खूप चर्चा आहे. पण मुलीच्या या निर्णयामुळे मुलाचे मात्र मोठे नुकसान झाले आहे.

 

संबंधित व्हायरल व्हिडीओवर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी मुलीला दोष दिला आहे. दुस-या मुलावर प्रेम होते. तर मग हे लग्नाच्या आधीच का सांगितले नाही, असा प्रश्न उपस्थित केला आहे. तर काहींनी मुलीच्या धाडसाचे काैतुक केले आहे. पण तुर्सास हा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!