Latest Marathi News
Ganesh J GIF

नवरदेवची ती कृती पाहून नवरीला बसला शाॅक

नवरदेवाचा व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल, नवरी आणि पाहुणे मंडळीही हैराण, एकदा बघाच!

दिल्ली – सोशल मिडीयावरील लग्नाचे मजेशीर व्हिडीओ नेहमीच अनेकांचे लक्ष वेधून घेतात. त्यातच आजची लग्न डान्स शिवाय अपूर्णच वाटतात.सध्या सोशल मिडीयावर असाच एक व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे.

लग्न हा दोन जीवंचा एकत्र येणारा सोहळा असला, तरीही लग्नात अनेक गमतीदार गोष्टी देखील पहायला मिळतात. आत्ताच्या लग्नात डान्स करणे हा ट्रेंड बनत चालला आहे. पण हा ट्रेंड फाॅलो करताना अनेकांची बत्ती गुल होते. सध्या सोशल मिडीयावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये नवरदेव ‘कयामत-कयामत’ या गाण्यावर डान्स करताना दिसतो. वरमालानंतर तो नवरीला आनंदी करण्यासाठी स्टेजवर येतो आणि धडाकेबाज डान्स करताना दिसतो. मात्र, त्याचे स्टेप्स इतके विचित्र आणि मजेशीर आहेत की नवरी गालातल्या गालात हसते. पण तो आपला विचित्र डान्स चालूच ठेवतो, त्यामुळे अखेर नवरी देखील आपले हसू रोखू शकत नाही. अखेरीस ती थेट जोरात हसायला लागते. पाहुणे मंडळींची तर हसुन पुरेवाट लागलेली असते.

नवरदेवाचा हा व्हिडिओ @praveshkumar2109 या इन्स्टा आयडीवरुन शेअर करण्यात आला आहे. यावर अनेक गमतीशीर कमेंट करण्यात आल्या आहेत. यात अनेकांनी नवरदेवाच्या डान्सची खिल्ली उडवली आहे. तर काहींनी आत्मविश्वासाचे काैतुक केले आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!