Latest Marathi News
Ganesh J GIF

बारामती पोटनिवडणुकीचा ‘क्लायमॅक्स’ सुरू! ३० जणांनी अर्ज नेले

बारामतीत दिवंगत अजित पवार यांच्या निधनानंतर पोटनिवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे येत्या 6 एप्रिल रोजी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत सुनेत्रा पवार आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती आहे.

या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीने बारामती शहर व तालुक्यात आजपासून घोंगडी बैठकांना सुरुवात झाली असून कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. गावागावात जाऊन मतदारांशी थेट संवाद साधत सुनेत्रा पवार यांना प्रचंड बहुमताने विजयी करण्यासाठी रणनिती आखली जात आहे. या निवडणुकीत सुनेत्रा पवार यांना अजित पवारांपेक्षा जास्त मताने मतांनी निवडून आणण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी केला आहे. तर एकीकडे ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी प्रयत्न सुरू असतानाच बारामती पोट निवडणुकीसाठी 30 जणांनी अर्ज नेले असल्याची माहिती आहे.

सुनेत्रा पवार यांची निवडणूक बिनविरोध करण्यावर महायूतीचा भर आहे. पण ३० अर्जांपैकी किती अर्ज भरले जातात, किती पात्र होतात आणि किती अर्ज मागे घेतले जाणार हे अद्याप अस्पष्ट आहे. निवडणूक बिनविरोध करण्यासाठी सुनेत्रा पवार कुणाकुणाला भेटणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. ही निवडणूक बिनविरोध होणार का? याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. तर सुनेत्रा पवार यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी 6 तारखेला मुख्यमंत्री बारामतीत येणार आहेत अशी माहिती मिळत आहे.

बारामती विधानसभा पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून मतदान 23 एप्रिल 2026 रोजी होणार आहे. उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख 6 एप्रिल असून अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत 9 एप्रिल आहे. आतापर्यंत 3 जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. पहिल्या दिवशी उमेदवारी अर्ज भरणारे हे तीनही उमेदवार बारामतीच्या बाहेरचे आहेत. हिंदुस्थान जनता पार्टी मधून सतीश कदम, सागर भिसे यांनी अपक्ष तर न्यू राष्ट्रीय समाज पार्टी तर्फे राजू घुटूकडे यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!