Latest Marathi News
Ganesh J GIF

हातात पिस्टल घेऊन रिल्स काढणाऱ्याला गुन्हे शाखेकडून अटक

हातात पिस्टल घेऊन रिल्स बनवणाऱ्या भाईच्या पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने मुसक्या आवळल्या आहेत. चिखली भागातील भिमशक्तीनगर येथील सार्वजनिक रोडवरुन दुचाकीवरुन जाताना पिस्टल हवेत फिरवून दहशत पसवणाऱ्या पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.त्यातील एका अल्पवयीन मुलासह दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. ही घटना 9 जुलै रोजी रात्री दहा वाजता घडली होती.कुणाल रमेश साठे (वय 26, रा. मोरेवस्ती, चिखली) याला अटक केली आहे. तर त्याचा अल्पवयीन साथीदाराला ताब्यात घेण्यात आले आहे. तर यश कांबळे (रा. टॉवर लाईन, चिखली), सुशील गोरे उर्फ बारक्या (रा. ओटास्कीम, निगडी) आणि रोहित मिश्रा यांच्या विरोधात क्रिमीनल लॉ अमेंडमेंट अॅक्ट, महाराष्ट्र पोलीस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला असून आरोपी फरार आहेत. याबाबत खंडणी विरोधी पथकातील पोलीस अंमलदार आशिष बोटके यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

वाहनांची तोडफोड करताना, हातात कोयते घेऊन रिल्स बनवून ते सोशल मीडियावर व्हायरल करुन परिसरात दहशत पसरवणाऱ्या भाईंवर पोलिसांकडून कारवाई करण्यात येत. परिसरात आणि सोशल मीडियावर दहशत पसरवण्यासाठी हातात पिस्तूल घेऊन रिल्स काढणाऱ्या दोघांच्या खंडणी विरोधी पथकाने मुसक्या आवळल्या आहेत.फिर्य़ादी आशिष बोटके यांना एका इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ दिसला. यामध्ये एका दुचाकीवरून तिघेजण जात असून त्यातील मागे बसलेल्या एकाच्या हातात पिस्टल होते. पिस्टल हवेत फिरवून ते दहशत निर्माण करत असल्याचे दिसून आले. हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर अपलोड करुन त्यांनी दहशत पसरवली. याचा तपास करताना पोलिसांनी सुरुवातीला व्हिडीओ मध्ये दिसणाऱ्या गाडीचा क्रमांक मिळवला.

गाडी क्रमांकावरुन पोलिसांनी आरोपींची ओळख पटवली. त्यानंतर पोलिसांनी चिखली परिसरातून एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी करुन दुचाकी चालवणारा कुणाल साठे याला अटक केली. तर यश कांबळे याने मागे बसून हातात पिस्टल घेऊन दहशत पसरवल्याचे आरोपींनी सांगितले. तर त्यांच्या इतर दोन साथीदारांनी हा व्हिडीओ बनवला.आरोपींना चिखली पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. पुढील तपास चिखली पोलीस करीत आहेत.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!