Latest Marathi News
Ganesh J GIF

गर्दी बघत होती..कोयत्याचे वार, “ती” एकटी लढत होती, बघा बातमी सविस्तर

       पोलिस ठाण्यातील ड्युटी संपवून महिला पोलिस हवालदार सीमा वळवी घरी जात होती. त्यांनी कोणताही विचार न करता रस्त्यावर उतरून आपले काम सुरु केले. पोलीस येईपर्यंत गुंडाला पकडून ठेवले. वडगाव शेरी येथील दिगंबर नगरात रस्त्यावर रात्री अकरा वाजता वाद सुरु होता.काही जण एकमेकांना मारहाण करत होते. दगड, विटांचा मारा होत होतो. त्याचवेळी चंदननगर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या हवालदार सीमा वळवी ड्यूटी संपवून घरी जात होत्या. गर्दी पाहून त्या थांबल्या. आपल्या आवाजात मारहाण करणार्‍यांना दरडावले. त्या वेळी काही जणांनी घटनास्थळावरुन पळ काढला. परंतु एका आरोपीने कोयता काढला. त्याने कोयत्याने दुसऱ्या तरुणावर वार केले. एकट्या असलेल्या वळवी सर्वांना रोखण्याचा प्रयत्न करत होत्या. तसेच नंतर आरोपींना पकडता यावे म्हणून एका हाताने मोबाईलद्वारे चित्रीकरण करत होत्या. या वेळी एकट्या लढणाऱ्या वळवी यांच्या मदतीला कोणी आले नाही.
     एका आरोपीने कोयत्याने वार केल्यामुळे दोन जण जखमी झाले. वळवी यांनी धावत जाऊन एका आरोपीला पकडले. त्यानंतर नियंत्रण कक्षाला फोन केला. चंदननगर पोलिस ठाण्याला माहिती दिली. त्यानंतर काही वेळेत पोलिसांचे पथक घटनास्थळी आले. अवघ्या 20 मिनिटांत पोलिसांनी मारहाण करणार्‍या आरोपींना बेड्या ठोकल्या. भर रस्त्यावर धुडघूस घालणारे आरोपी एका महिला पोलीस हवालदाराच्या साहसामुळे पकडले गेले. यामुळे या कारवाईचे कौतुक होते आहे. सीमा वळवी यांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे सर्व आरोपींना बेड्या ठोकल्या गेल्या.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!