
लहान दिराच्या लग्नात मोठ्या वहिनीचा हटके थाट
होणाऱ्या जाऊबाईसमोर वहिनीचा भन्नाट डान्स, डान्स स्टेप पाहून पाहुणे शाॅक, वहिनी राॅक
पुणे – घरात लग्न असेल तर सर्वांचा उत्साह वेगळ्या उंचीवर असतो. जर एकत्र कुटुंब असेल तर त्या आनंदात आणखी भर पडत असते. जर घरात मोठी वहिनी असेल आणि लग्न लहान दिराचे असेल तर त्या वहिनीचा आनंद खूपच खास असतो. सध्या अशाच एका वहिनीचा डान्स सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे.
अलीकडे लग्नात एन्ट्रीदरम्यान डान्स करण्याचा ट्रेंड सध्या खूपच व्हायरल होत आहे. नवरा किंवा नवरी हमखास लग्नात हटके एंट्री करत सर्वांचे लक्ष वेधून घेत असतात. तर कधी कधी एकत्र डान्स करुन लग्नात रंगत आणत असतात. कारण लग्न ही आठवण आयुष्यभर जपण्यासाठी वेगवेगळे प्रयोग केले जातात. पण सध्या एका वहिनीने आपल्या दिराच्या आणि होणाऱ्या जाऊबाईच्या एंट्रीवेळ भन्नाट डान्स करत धमाल उडवून दिली आहे. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता नववधू आणि नवरदेव एन्ट्री घेत असतात. व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये, लग्न सोहळ्यामध्ये सर्वत्र उत्साहाचं वातावरण आहे.लग्न सोहळ्यात डान्सचा माहोल तयार झाला आहे. या व्हिडीओतील महिला ‘हम आपके है कोण’ या हिंदी चित्रपटातील ‘लो चली मै अपनी देवर की बारात लेके’ या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. या व्हिडीओत महिलेचा दीर देखील आपल्या वहिनीसोबत थिरकताना दिसतोय. वहिनींच्या डान्स स्टेप्स पाहून वऱ्हाडी मंडळींनी टाळ्या-शिट्ट्यांची अक्षरशः बरसात केली आहे. वहिनीच्या चेहरा आणि त्यावरील आनंद बरेच काही सांगून जाणारा आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ marathi_royal_karbhar नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. यावर नेटकरी आता वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.
लग्नात डान्स कंपल्सरी झाल्यामुळे आता पुरुषंबरोबर महिलादेखील डान्स करण्यात आघाडीवर असतात. अगोदर नवरदेव पारण्याला जात असताना दोस्त मंडळी डान्स करत असत. पण आता हळदी बरोबरच संगीत हा विशेष कार्यक्रम ठेवत अनेकजण त्यात सामील होत आहेत.