Latest Marathi News
Ganesh J GIF

संतापलेल्या बापाने दारूच्या नशेत पोटच्या मुलालाच कायमचा संपवला ; घटनेनं कुटुंब हादरलं

आग्रा – उत्तर प्रदेशातील आग्रा येथे खळबळजनक प्रकार समोर आला आहे. याठिकाणी व्यसनाधीन बापाने त्याच्या पोटच्या १६ वर्षीय मुलाच्या छातीत गोळ्या झाडून हत्या केली आहे. मुलाची हत्या करून बाप पसार झाला. आरोपी वडील निवृत्त लष्करी जवान आहे. दारू पिऊन शिवीगाळ करणाऱ्या बापाला मुलाने रोखल्यानं तो संतापला होता. त्यातूनच आरोपी बापाने परवानाधारक बंदुकीतून मुलावर गोळी झाडली. ज्यात मुलाचा मृत्यू झाला. या घटनेनं कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे.

आग्रा येथील राजपूर चुंगी परिसरात राहणारा धीरज गुर्जर  हा व्यसनाधीन होता. बुधवारी संध्याकाळी ७ वाजता धीरज दारू पिऊन घरी आला होता. घरी येताच त्याने शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यावरून घरात वाद सुरू झाला. त्यावेळी १६ वर्षीय मुलगा विवेक जनावरांना चारा घालत होता. विवेकने वडील धीरज यांना शिवी देण्यास रोखले. त्यावरून संतापलेल्या बापाचा राग इतका अनावर झाला की त्याने घरात ठेवलेल्या परवानाधारक बंदुकीने विवेकला गोळी झाडली. मृत विवेकची आई सुधा यांनी सांगितले की, धीरज स्वत:च्या १६ वर्षीय मुलावर गोळी झाडेल याचा विचारही आम्ही केला नव्हता. जेव्हा गोळीचा आवाज ऐकला तेव्हा विवेक रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर पडला होता. छोटा भाऊ नितीनही धावत आला. गोळी झाडल्यानंतर धीरज पसार झाला.

विवेकला तातडीने आम्ही एसएन मेडिकल कॉलेजला नेले तोपर्यंत खूप वेळ निघून गेली होती. विवेक नववीच्या वर्गात शिकत होता. वडिलांच्या जागी तो घरातील कामे सांभाळायचा. त्याचे वडिलांवर खूप प्रेम होते. विवेक त्याच्या वडिलांना समजावत होता मात्र त्याच वडिलांनी मुलाला कायमचा संपवला. दरम्यान, धीरजने १२ वर्ष सैन्यात नोकरी केली होती. दारूचं व्यसन लागल्याने धीरजला सैन्यातून अनफिट केले होते. याचवर्षी त्याला सैन्याने निवृत्ती दिली होती. तो घरी पत्नी सुधासोबत वारंवार भांडण करायचा. या घटनेनंतर तो फरार आहे. पोलीस सध्या सीसीटीव्हीच्या मदतीने आरोपी वडिलांचा शोध घेत आहे. लवकरच आरोपीला अटक करू असं आश्वासन पोलीस अधिकारी देत आहेत.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!