
एका मिठाई विक्रेत्याकडे अज्ञात व्यक्तीने फोन करुन दोन खोके खंडणीची मागणी केली आहे. खंडणी न दिल्यास कुटूंबाला जीवे मारण्याची धमकी दिली आहे. त्याला आलेले फोन हे कॉल सेंटरच्या इंटरकॉमवरुन आल्याचे निष्पन्न झाले आहे.याप्रकरणी मांगीलाल घिसाराम चौधरी (४४,रा. दळवीनगर , मुंढवा) यांनी मुंढवा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार चौधरी यांचे मिठाईचे दुकान भाडेतत्वावर आहे तसेच त्यांचे घरही भाड्याने घेतलेले आहे. त्यांना आणि त्यांच्या मुलाच्या मोबाईलवर अज्ञात व्यक्ती मागील दहा ते पंधरा दिवसांपासून वारंवार कॉल करुन धमकी देत आहेत.
‘तुम्हारे दो बेटे है, उनका नाम सुरेंद्र और महेंद्र हे अशी माहिती देऊन दो खोके खंडणी देना पडेगा नही तो तुम्हारा छोटा लडका क्रिकेट खेलना जाता हे, उसे उठाऊंगा, तुम्हारे फॅमिलीको खतम करुंना अशी धमकी दिली. फिर्यादीने सुरवातीला त्याकडे दुर्लक्ष केले. मात्र धमकीचे फोन वारंवार येऊ लागले. तु पैसे नही देगा तो देख हम क्या करते है, तु पछतायेगा अशा धमक्या येऊ लागल्या. याप्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक समीर करपे करत आहेत.