
‘या’ माजी नगरसेविकेच्या कुटुंबाचा दादांच्या राष्ट्रवादीत प्रवेश
अजित दादांच्या मिलनाचा कॉंग्रेसपेक्षा भाजपला धसका, महापालिका निवडणुकीसाठी दादांच्या नियोजनामुळे भाजप घायाळ
पुणे – महापालिका निवडणुकीचे वारे जोरदार वाहन असताना पुण्यात अजित पवार गटाने काँग्रेसला धक्का दिला असून, माजी नगरसेविकेनं संपूर्ण परिवारासह पक्षप्रवेश केला आहे. त्यामुळे पुण्यात राष्ट्रवादीची ताकत वाढली आहे.

माजी नगरसेविका सुजाता शेट्टी, माजी स्थायी समिती अध्यक्ष सदानंद शेट्टी आणि त्यांचे पुत्र साक्षात शेट्टी यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. शेट्टी कुटुंबाचे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघात चांगले वर्चस्व आहे. सुजाता शेट्टी या २०१७ च्या महापालिका निवडणुकीत काँग्रेसमधून निवडून आल्या होत्या. तसेच, काही महिन्यांपूर्वीच काँग्रेसने सदानंद शेट्टी यांना प्रदेश सरचिटणीस या महत्त्वाच्या पदावर नियुक्त केले होते. अजित पवार हे आज पुणे दौऱ्यावर असून ते खडकवासला विधानसभा मतदारसंघात ‘राष्ट्रवादी परिवार मिलन’ कार्यक्रम करत आहेत. याच कार्यक्रमादरम्यान आज अजित पवार हे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघात काँग्रेसला खिंडार पाडणार असून माजी नगरसेविका सुजाता शेट्टी, माजी स्थायी समिती अध्यक्ष सदानंद शेट्टी आणि त्यांचे सुपुत्र साक्षात शेट्टी हे आज अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. गेल्या आठवड्यातचं अजित पवारांनी काँग्रेसचे युवा नेते रोहन सुरवसे यांना पक्षात प्रवेश देत पहिला धक्का दिला होता तर आता माजी नगरसेविकेचे पूर्ण कुटुंबचं पक्षात घेत काँग्रेसला खिंडार पाडले आहे. पुण्यात २०१७ पर्यंत राष्ट्रवादीचे निर्विवाद वर्चस्व होते. पण २०१७ साली भाजपचे स्वबळावर १०० जागा जिंकत राष्ट्रवादीला रोखले होते. पण आता दोघेही सत्तेत एकत्र आहेत, त्यामुळे जास्तीत जास्त जागा मिळवण्यासाठी अजित पवार यांनी प्रयत्न सुरू केले आहेत.

अजित पवार यांनी काँग्रेसला खिंडार पाडले आहे, पण त्यामुळे भाजपची चिंता वाढली आहे. भाजपने राष्ट्रवादीचा गड मानला जातं असणाऱ्या पुण्यात स्वबळावर आपला झेंडा फडकवला होता, त्याचे उट्टे काढण्यासाठी अजित पवार मिलन कार्यक्रम राबवत आहेत.


