
गौतमी पाटीलवर आरोप करणारे कुटुंबाने मानले गौतमीचे आभार!
नवले पूल अपघात प्रकरणात मोठा ट्विस्ट, गौतमी पाटील-मरगळे कुटुंब यांच्यात सेटलमेंट? तो व्हिडिओ व्हायरल
पुणे – मुंबई-बेंगलुरू महामार्गावरील वडगाव बुद्रुक येथे 30 सप्टेंबर रोजी पहाटे 5 वाजता गौतमी पाटीलच्या कारचा अपघात झाला होता. लोकप्रिय लावणी कलाकार गौतमी पाटील्या गाडीने रिक्षाला मागून धडक दिली होती. या अपघातात रिक्षाचालक सामाजी विठ्ठल मरगळे आणि दोन प्रवासी गंभीर जखमी झाले. सुरुवातीला मरगळे कुटुंबाने गौतमीवर आरोप केले होते. पण आता यात ट्विस्ट आला आहे.
वडगाव बुद्रुकमधील हॉटेल विश्वासजवळील सर्व्हिस रोडवर रिक्षाचालक सामाजी मरगळे प्रवासी घेण्यासाठी थांबले असताना, भरधाव वेगाने आलेल्या एमएच १२ डब्ल्यूझेड ६५८९ क्रमांकाच्या कारने रिक्षाला पाठीमागून जोरदार धक्का दिला. धडके इतकी प्रचंड होती की रिक्षा खराब झाला आणि मरगळे व दोन प्रवासी गंभीर जखमी झाले. सिंहगड रोड पोलिसांनी मरगळेंचा मित्र युवराज साळवे यांच्या तक्रारीवर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, गाडी जप्त करण्यात आली आहे. गौतमी पाटील हिच्या कार चालकाची चूक असताना हा अपघात झाला. मात्र या संपूर्ण प्रकरणाची गौतमी पाटीलच्या टीमकडून दखल घेण्यात आली नाही. तसेच पोलिसांकडून सीसीटीव्ही उपलब्ध होत नाही, पोलीस योग्य ते सहकार्य करत नाहीत असा आरोप आता रिक्षाचालक मरगळे यांच्या कुटुंबीयांनी केला. माझ्या वडिलांना दिनानाथ मंगेशकर रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला. तेव्हा गौतमी ताईंनी माझ्या वडिलांच्या तब्येतीचा आढावा घेतला. आम्ही अप्रोच केला यानंतर त्या आल्या. त्यांनी आमची विचारपूस केली. यासाठी त्यांचे खरंच धन्यवाद, असे मरगळे कुटुंबाने म्हटले आहे. गौतमीने यासंदर्भातील व्हिडीओ आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन शेअर केला आहे. त्यामुळे आधी आरोप आणि नंतर धन्यवाद असा या प्रकरणाचा शेवट झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. मात्र, ही केस कायदेशीर पेचात अडकलेली असताना पुढे नक्की काय होणार? हे प्रकरण कायदेशीररित्या थांबणार का? हे पाहणं महत्वाचं असणार आहे, कारण यात थेट चंद्रकांत पाटील यांनी देखील लक्ष घालत पोलिसांना आदेश दिले होते.
गौतमीला अटक करावी या मागणीसाठी पुण्यात पोलीस ठाण्याबाहेर आंदोलने देखील झाली होती. या प्रकरणी वातावरण तापल्यानंतर गौतमीने पत्रकार परिषद घेत भूमिका मांडली होती. यावेळी पीडित कुटुंबियांनी आपल्याकडे लाखोंची मागणी केली, असा दावा गौतमीने केला होता.