Latest Marathi News
Ganesh J GIF

मुलीच्या बापाने मुलीच्या मित्रावर चाकूने केले सपासप वार

हल्ल्याचा थरार सीसीटीव्हीत कैद, शिक्षकासमोरच बापाचे निर्दयी कृत्य, या कारणामुळे केला हल्ला

अहमदाबाद – एका इन्स्टिट्यूटमध्ये मुलीच्या बापाने तिच्या मित्रावर चाकूने हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे शिक्षकासमोरच हा हल्ला करण्यात आला. त्यामुळे खळबळ उडाली आहे.

गुजरातच्या भावनगर जिल्ह्यातील ओझ इन्स्टिट्यूटमध्ये ही घटना घडली आहे. कार्तिक असे हल्यात जखमी झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. तर अटक केलेल्या आरोपीचे नाव जगदीश रचाड आहे. जखमी कार्तिक आणि आरोपी जगदीश रचाड याची मुलगी एकाच ट्यूशनमध्ये शिकायला आहेत. त्यामुळे त्यांच्यात जवळीकता वाढली, आणि ते फोनवरून एकमेकांशी बोलू लागले. ही बाब मुलीचे वडील जगदीश रचाड याला समजली. यामुळे जगदीश रचाड यांनी ट्युशन सेंटरकडे तक्रार केली. या वादावर तोडगा काढण्यासाठी शिक्षक, मुलगा, मुलगी आणि तिचे वडील यांच्यात चर्चा सुरू होती. तेंव्हा अचानक मुलीच्या वडिलांनी खिशातून चाकू काढला आणि मुलाच्या मांडीवर पाठीवर सपासप वार करायला सुरुवात केली. मुलीच्या बापाने त्या मुलावर पाच सेकंदात चाकूने सपासप सहा वार केले. यावेळी शिक्षकाने घाबरून मुलीच्या वडिलांसमोर हात जोडले. तर मुलगी देखील घाबरली. हा सगळा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

https://x.com/kathiyawadiii/status/1889260221534814521?t=KOOajBDNoBsZij4XW3c-RA&s=19

 

हल्ल्यात संबंधित मुलगा गंभीर जखमी झाला आहे. त्याच्या मांडीवर आणि पाठीवर खोल घाव झाले आहेत. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. हल्ल्याची ही घटना उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून मुलीच्या वडीलांना अटक केली आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!