
बापरे! नवरीचा डान्स बघून नवरदेवाने गाणेच बंद केले
नवरीच्या विचित्र डान्सचा व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल, नवरी राॅक, नवरदेव शाॅक, नवरीचा डान्स बघाच!
दिल्ली – लग्न समारंभात अलीकडे डान्स हमखास असतो. खासकरून नवी नवरी आपल्या होणाऱ्या नवरदेवाला खुश करण्यासाठी किंवा आपले प्रेम व्यक्त करण्यासाठी डान्स करत असते. पण कधी कधी हा डान्स अडचणीचाही ठरतो.
सोशल मीडियावर लग्नातील अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत. गेल्या काही दिवसात मजेशीर व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. लग्नात नवरा-नवरीच्या एन्ट्रीच्या बाबतीत पूर्वीपेक्षा बरेच बदल झाले आहेत. तसेच हार घातल्यावर देखील आता डान्स केला जात आहे. पण सध्या एका नवरीच्या वेगळ्याच अंदाजातील डान्स व्हायरल होत आहे. व्हिडिओत दिसत आहे की, स्टेजवर नवरा मुलगा आणि नवरी मुलगी शांतपणे बसलेले दिसतात. डीजेवर गाणं सुरु असतं आणि सभोवती नातेवाईक व मित्रांची गर्दी असते. इतक्यात दोन मैत्रिणी नवऱ्या मुलीला डान्स करण्यासाठी उकसवतात. सुरुवातीला ती थोडा संकोच करते, पण नंतर मात्र नवरी असा डान्स करू लागते की, सगळेच शाॅक होतात. आजूबाजूच्या सर्व नजरा तिच्यावर खिळतात. पण या सगळ्यात नवरदेवाचा चेहरा मात्र पाहाण्यासारखा असतो. त्याच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसते. शेवटी तो सावधपणे उभा राहतो आणि गाणं थांबवण्याचा प्रयत्न करतो. अनेक प्रयत्नांनंतर शेवटी गाणं बंद केलं जातं आणि मग कुठे नवरी मुलगी थांबते. पण तोपर्यंत नवरीने सगळ्याच धक्का दिला होता.
हा व्हिडिओ @iam_mahipal__ या इंस्टाग्रामवर हँडलवरून शेअर करण्यात आला आहे. तो सध्या जोरदार व्हायरल होत आहे. अनेकांनी नवरदेवाच्या पुढील आयुष्यावर चिंता व्यक्त केली आहे. तर अनेकांनी मजेशीर कमेंट करत नवरीचे काैतुक केले आहे.