
लग्न मंडपातच नवरीच्या त्या कृतीने नवरदेव संतापला आणि…
सोशल मिडीयावर व्हिडिओ जोरदार व्हायरल, या कारणामुळे झाला तणाव, तुम्हीच सांगा कोण चुकीचे..
मुंबई – लग्न हा अनेकांच्या आयुष्यातील महत्वाचा क्षण असतो. त्याचवेळी लग्न मंडपातील अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. सध्या सोशल मिडीयावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. यात नवरा नवरी चक्क मंडपातच भांडत बसले आहेत.
पती-पत्नीमध्ये लहान-मोठ्या गोष्टींवरून भांडणं होणं फार मोठी गोष्ट नाही. पण लग्नानंतरचे पहिले काही महिने त्यांच्यासाठी फारच आनंदाचे असतात. या दिवसांमध्ये दोघेही एकमेकांशी प्रेमाने, आपुलकीने बोलतात. पण, लग्न जसं जुनं होतं तसे दोघांमध्ये वाद सुरू होतात. प्रत्येक जोडप्यामध्ये या सर्व गोष्टी सामान्य आहेत. पण, आता व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये लग्न लागल्या लागल्या वधू-वरामध्ये वाद झालेला पाहायला मिळत आहे. व्हिडीओत दिसत आहे की, लग्नमंडपामध्ये लग्न पार पडल्यानंतर वधू-वर जेवण करण्यासाठी बसतात. यावेळी वधूचे लक्ष तिच्या फोनमध्ये होते, ज्यामुळे वर तिच्या हातातला फोन काढून घेतो आणि बाजूला ठेवतो. यावर वधूला त्याचा खूप राग येतो. ती त्याला रागात काहीतरी बोलते, ज्यावर वर पुन्हा तिचा फोन तिला देतो व भरल्या ताटावरून उठून निघून जातो. सध्या त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @love_song_officil या अकाउंटवर शेअर करण्यात आला असून तो जोरदार व्हायरल होत आहे.
लग्नसराईचे दिवस म्हटलं की हल्ली सोशल मीडियावरही लग्नातील अनेक मजेशीर व्हिडिओ व्हायरल होत असतात. अनेकदा नवरा नवरी डान्स करत असतानाचे व्हिडीओ जोरदार व्हायरल होत असतात. पण आता भांडण व्हायरल होत आहे.