
नवरीचा हटके डान्स पाहून नवरदेव झाला लालेलाल
नवरीच्या डान्सचा व्हिडिओ जोरदार व्हायरल, पाहुणेही आवक, नवरीचा उत्साह बघाच!
पुणे- लग्नात काही क्षण मजेशीर तर काही भावुक असतात. कधी नवरा-नवरी आनंदाने हसताना दिसतात तर कधी त्यांनी पाहिलेलं स्वप्न प्रत्यक्षात साकार होताना पाहून त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रूही येतात. सध्या अशाच एका आनंदी नवरीचा डान्स व्हायरल होत आहे.
लग्न म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यातील एक खास, महत्त्वाचा असा क्षण असतो आणि हा क्षण फक्त नवरा-नवरीच नव्हे तर सर्वांच्या कायम लक्षात राहावा यासाठी प्रयत्न केले जातात. अगदी सध्या नवरा-नवरीसुद्धा आपल्याच लग्नात काही ना काही सरप्राइझ देण्याचा प्रयत्न करत असतात. अगोदर नवरदेवाची वरात खिडकीतून पाहणारी नवरी आता आपल्या होणाऱ्या नवरोबाचे स्वागत स्वतः डान्स करत करताना दिसते. सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यात मगरीने भन्नाट डान्स केला आहे. व्हिडिओत दिसत आहे की, नवरीने “खंडोबाला नवस केला लाखात एक पोरगा भेटू दे मला” या मराठी गाण्यावर भन्नाट डान्स केला आहे. यावेळी नवरदेवही स्टेजवर उभा आहे.यावेळी नवरीचा डान्स पाहून नवरदेवही खूश होऊन लाजत आहे. पण नवरी मात्र भन्नाट डान्स करत आहे. @panditsayali.sp या पेजवर नवरीला आवडता नवरा भेटतो या कॅप्शनसह व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यात अनेकांनी नवरीचे काैतुक केले आहे. यावर आता नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. ,”जेव्हा नवरीला मनासारखा नवरा भेटतो” असा आशयाचा कमेंट केल्या आहेत.
वैवाहिक आयुष्याची सुरूवात करताना लग्नाच्या दिवशी अनेक नवरा-नवरी कपल्स डान्स करताना दिसतात.अशाच एका नवरीच्या डान्सचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.