
संबळाच्या तालावर नवरीचा डान्स पाहून पाहुणेमंडळी हैराण
सोशल मिडीयावर व्हिडिओ जोरदार व्हायरल, डान्सवर काैतुक आणि टीकाही , एकदा बघाच!
मुंबई – लग्न आणि व्हायरल व्हिडीओ असे समीकरणच आजकाल तयार झाले आहे. कारण अलीकडे लग्नात काहीतरी हटके करण्यासाठी नवरा नवरी देखील डान्स करत आहेत. सध्या सोशल मिडीयावर असाच एका नवरीचा व्हिडिओ तुफान व्हायरल झाला आहे.
लग्न म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यातील एक खास, महत्त्वाचा असा क्षण असतो आणि हा क्षण फक्त नवरा-नवरीच नव्हे तर सर्वांच्या कायम लक्षात राहावा यासाठी प्रयत्न केले जातात. त्यात अलिकडे डान्स करण्याचा नवीन ट्रेंड सुरु झाला आहे. त्यामुळेही लग्नाचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत. सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत दिसत आहे की, नवरा नवरी लग्नानंतरच्या जागरण गोंधळाच्या कार्यक्रमात नाचत आहेत.नवरीचा डान्स पाहून तिथे असलेला प्रत्येकजण हैराण झालेला आहे तर नवरी सर्वांना विसरुन आनंदाने डान्स करत आहे. डान्स करत असताना त्या दोघांमधली केमिस्ट्री स्पष्टपणे दिसून येत आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ marathi_royal_karbhar नावाच्या इनस्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. त्याला सध्या मोठ्या प्रमाणात व्हिव्ज आणि प्रतिक्रिया मिळत आहेत.
लग्नाचे असे बरेच व्हिडीओ तुम्ही पाहिले असतील. लग्नातील भन्नाट व्हिडीओ नेहमी व्हायरल होत असतात. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर प्रत्येकजण नवरा-नवरीच्या डान्सचं कौतूक करताना दिसत आहे.