
नवरीचा तो डान्स पाहून पाहुणेमंडळी झाले गपगार
कपल डान्सचा व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल, नवरीने डान्स करताना केले असे काही....
मुंबई – सध्या सोशल मीडियावर चर्चा असते ती म्हणजे व्हायरल व्हिडीओची. त्यातून लग्नातले डान्स रील्स हे चांगलेच व्हायरल होताना दिसतात. सध्या असाच एक व्हिडीओ हा व्हायरल झाला आहे. यात मगरीने धमाल केली आहे.
अलीकडे लग्नात नवरा आणि नवरीचा डान्स हमखास असतो. कारण लग्नाचा क्षण खास बनवण्यासाठी सगळी धडपड सुरु असते. सध्याचा व्हायरल व्हिडीओ एका लग्नातला आहे. व्हिडीओमध्ये नवरेदव नवरी डान्स करताना दिसत आहे तर इतर नातेवाईक मित्रमंडळ त्यांचा डान्स बघत आहे. व्हिडीओत तुम्हाला दिसेल की नवरदेव नवरी ”अकेला है मिस्टर खिलाडी, मिस खिलाडी चाहिए” या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. त्यांचा डान्स पाहून कोणीही थक्क होईल. त्यांच्या डान्स स्टेप्स अन् चेहऱ्यावरील हावभाव पाहून तुम्हाला हा डान्स पुन्हा पुन्हा पाहावासा वाटेल. ते दोघंही अप्रतिम असा सुंदर डान्स करताना दिसतात. सध्या हा डान्स व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. यावेळी नवरीने जांभळ्या कलरचा शरारा परिधान केला आहे. तर नवऱ्याने शेरवानी परिधान केली आहे. त्यांचा हा हटके डान्स पाहून सगळेच अवाक झाले आहेत. @lord_rama_wedding_events1 या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.
यापूर्वी सुद्धा सोशल मीडियावर असे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. नवरी नवरदेवाच्या डान्स व्हिडीओवर नेटकरी नेहमी कौतुकाचा वर्षाव करतात. सध्या सोशल मिडीयावर कपल डान्सची चर्चा आहे.