Latest Marathi News
Ganesh J GIF

पत्नीची हत्या करुन पतीनेही केली आत्महत्या

काही महिन्यापूर्वी केला होता आंतरजातीय विवाह, सुसाईट नोटमुळे खळबळ

अमरावती – पत्नीची गळा आवळून हत्या केल्यानंतर स्वतः पतीनेसुद्धा आत्महत्या करून जीवन संपवल्याची धक्कादायक घटना अमरावतीत समोर आली आहे. यावेळी सर्वांची माफी मागणारी सुसाईड नोट देखील सापडली आहे. यात सर्वांची माफी मागण्यात आली आहे.

अमोल सुरेश गायकवाड व शिल्पा अमोल गायकवाड असे मृत दाम्पत्याचे नाव आहे. ही घटना रहाटगाव येथील प्रज्ज्वल पात्रे यांच्या शेतात घडली. मिळालेल्या माहितीनुसार, मूळचे धामणगाव तालुक्यातील वाठोडा आणि सध्या रहाटगाव येथील रहिवासी अमोल गायकवाड आणि रामगाव येथील शिल्पा गायकवाड यांचा ७ महिन्यांपूर्वी आंतरजातीय विवाह झाला होता. जिल्हा पुरवठा कार्यालयातील पुरवठा निरिक्षक प्रज्वल विठ्ठलराव पात्रे यांच्या शेतात अमोलचे वडील रखवालदारी आणि मजुरी करत होते. त्याठिकाणी असलेल्या दुमजली फार्म हाऊसमध्ये अमोल आणि शिल्पा तसेच अमोलचे वडील सुद्धा वास्तव्यास होते. अमोल रहाटगाव रिंगरोड भागातील एका संकुलातील भाड्याच्या खोलीत किराणा दुकान चालवित होता, तर शिल्पादेखील खासगी नोकरी करीत होती. अमोल यापूर्वी मार्केटिंग करीत होता. घटनेच्या वेळी आईवडील खालच्या खोलीत तर मुलगा अमोल व सून शिल्पा वरच्या खोलीत होते. मुलगा व सून नऊ वाजेपर्यंत खोलीबाहेर पडले नाहीत. त्यामुळे खाली राहत असलेल्या आईवडिलांनी वरच्या खोलीत जाऊन बघितले असता मुलगा फासावर लटकलेला तर सून ही खोलीतील बेडवर मृतावस्थेत पडलेली आढळून आली. ज्या खोलीत मृतदेह आढळून आले तेथे एक चिठ्ठी होती. त्यात स्वत:च्या मर्जीने आत्महत्या करीत असल्याचे लिहिले होते. पण कारण मात्र समजू शकले नाही. पती-पत्नीचा मृतदेह ते राहत असलेल्या घरात आढळले. पीएम रिपोर्ट आल्यानंतर प्रकरणाचा उलगडा होईल. तूर्तास आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. दरम्यान घटनेला आर्थिक चणचण व दारूच्या व्यसनाची किनार असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.

अमोलने शिल्पाची हत्या का केली? स्वतः गळफास का घेतला?काही घातपात झाला याबाबत सर्वच बाजूने पोलीस तपास करीत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक महेंद्र अंभोरे यांनी दिली आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!