
नव्या नवरीचा डान्स पाहून नवरदेवही लाजला
नवरीच्या डान्सचा व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल, पाहुणेही आवक, डान्स एकदा बघाच!
मुंबई – सोशल मिडीया हे स्वतःहाला व्यक्त होण्याचे किंवा आपले सुखदुःखाचे क्षण व्यक्त होण्याचे हक्काचे स्थान झाले आहे. सोशल मिडीयावर हजारो व्हिडीओ अपलोड होत असतात. पण त्यातील काहीच व्हिडिओ तुफान व्हायरल होत असतात. सध्या सोशल मिडीयावर एका लग्नातील व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे.
लग्न म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यातील एक खास, महत्त्वाचा असा क्षण असतो आणि हा क्षण फक्त नवरा-नवरीच नव्हे तर सर्वांच्या कायम लक्षात राहावा यासाठी प्रयत्न केले जातात. सध्या एका नवरीबाईचा व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यात तिने लग्नात नवऱ्यासाठी धम्माल डान्स केला आहे. व्हिडिओत दिसत आहे की, नवरी नवरदेवाला स्टेजवर बोलवून “खंडोबाला नवस केला लाखात एक पोरगा भेटू दे मला” या मराठी गाण्यावर डान्स करु लागते. नवरीचा डान्स पाहून नवरदेव देखील लाजतो. पण नवरी सर्वांसमोर सुंदर डान्स करते. यावेळी अनेकजण तिला साथ देताना दिसतात. अगोदर लग्नात नवरी लाजताना आपण पाहिली आहे. पण आता नवरी बिनधास्त तर नवरदेव लाजरेबुजरे झाल्याचे दिसत आहेत. सध्या सोशल मिडीयावर हा व्हिडिओ धुमाकूळ घालत आहे.
सोशल मीडियावर हा व्हिडीओ firefliesweddings नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे.नेटकऱ्यांनाही नवरीचे काैतुक करत वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. नवरीचा भन्नाट डान्स अनेकजण पसंत करताना दिसत आहेत.