Latest Marathi News
Ganesh J GIF

ज्याला मेहूणा समजला तोच बायकोचा नवरा निघाला…! खतरनाक प्लॅनिंग, खतरनाक उलगडा !

मॅट्रिमोनियल साईटवरून जोडीदार शोधताना फसवणूक झाल्याच्या अनेक घटना समोर येतात. मात्र मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये एक अत्यंत धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका वकिलाने ज्या महिलेशी विवाह केला तिनेच त्याला फसवले आहे. या फसवणुकीत ती एकटी नव्हती. तर तिचा पहिला पती ही तिच्या सोबत होता. तिने तिने आपल्या पहिल्या पतीला तिचा ‘भाऊ’ असल्याचे वकिल नवऱ्याला सांगितले. शिवाय त्याला आपल्या घरात प्रवेश ही मिळवन दिला. त्यानंतर या दोघांनी मिळून जो काही कांड केला तो पाहून पोलीस ही हादरून गेले आहेत. त्याचीच चर्चा सध्या मध्य प्रदेशातील प्रत्येक घरात आणि गावात रंगली आहे.

खुडैल पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका वकिलाची मॅट्रिमोनियल साईटच्या माध्यमातून निर्मला सेंगर नावाच्या महिलेशी ओळख झाली. दोघांचे बोलणे सुरू झाले. त्यानंतर दोघांनी ही लग्न करण्याचा निर्णय घेतला. तो पर्यंत सर्व काही ठिक होते. वकली ही लग्नानंतर खुश होता. पण काही दिवसाने एक तरुण वकीलाच्या घरी आला. त्यावेळी पत्नी निर्मलाने तो आपला भाऊ असल्याचं सांगितलं. शिवाय त्याचं नाव शुभम सेंगर असल्याचं ही सांगितलं. बायकोचा भाऊ असल्याने वकीलाचा ही त्याच्यावर विश्वास बसला. ऐवढेच नाही तर शुभम त्या वकिलाच्या घरातच राहू लागला. पण वकीलाच्या पाठीमागे काय सुरू होते याची थोडी ही कल्पना त्याला नव्हती.

संधी मिळताच ही भामटी महिला आणि तिचा पहिला पती दोघांनी मिळून सुमारे 25 तोळे सोन्या-चांदीचे दागिने घेऊन पसार झाले आहेत. वकीलाला त्याची भनकही नव्हती. ज्यावेळी तो घरी आला त्यावेळी त्याला घरी ना बायको दिसली ना कथीत मेहूणा दिसला. त्याने त्यांची शोधाशोध सुरू केली. पण ते कुठेही सापडले नाही. घरातील कपाटं त्याने चेक केली. त्यावेळी सर्व दागिने घरात नव्हते. ते गायब झाले होते. हळुहळु हा सर्व प्रकार वकीलाच्या लक्षात आला. आपली फसवणूक झाली आहे हे त्याला समजले. त्याने तात्काळा या प्रकरणाचा छडा लावण्याचा प्रयत्न केला. पोलीसात ही तक्रार केली. पण ज्यावेळी या घटने मागचे सत्य त्याच्या समोर आले त्यावेळी त्याच्या पाया खालची वाळूच सरकली.

वकिलाने जेव्हा या प्रकरणाचा शोध घेतला, तेव्हा त्याला धक्काच बसला. ज्या शुभमला तो आपला मेहूणा समजत होता, तो प्रत्यक्षात निर्मलाचा पहिला पती निघाला. या दोघांचे 2024 मध्येच लग्न झाले होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे दोघेही कानपूर आणि इंदूरचे रहिवासी असून त्यांनी लग्नाचा बनाव रचून चोरी करण्याचा कट आखला होता. पोलिसांच्या प्राथमिक तपासात असे समोर आले आहे की, निर्मला आणि शुभम हे आधीपासूनच पती-पत्नी होते. त्यांनी केवळ चोरी करण्याच्या उद्देशाने हे ‘फेक मॅरेज’ केले होते. डीएसपी नितीन सिंह यांनी सांगितले की, “दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून शोध सुरू आहे.” या घटनेमुळे मॅट्रिमोनियल साईट्सवर जोडीदार निवडताना किती सावधगिरी बाळगायला हवी, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. ग्रामीण जिल्ह्याचे डीएसपी नितीन सिंह यांनी माहिती दिली की, आरोपी महिला कानपूरची असून तिचा पती इंदूरचा आहे. या दोघांनी सुनियोजित कट रचून वकिलाला फसवले आहे. सध्या आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहेत. लग्नासारख्या पवित्र नात्याचा वापर करून लूट करणाऱ्या या टोळीमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!