Latest Marathi News
Ganesh J GIF

खुल्या कारागृहातून कैदीने काढला पळ ! वारजे माळवाडीतील खून प्रकरणात झाली होती शिक्षा

(पुणे) – येरवडा येथील खुल्या कारागृहात असलेला जन्मठेपेचा कैदी रक्षकांची नजर चुकवून पळून गेला. राजू पंढरीनाथ दुसाने  (वय ४३) असे या कैद्याचे नाव आहे.

राजू दुसाने याला वारजे माळवाडी येथील खून प्रकरणात २०२५ मध्ये अटक करण्यात आली होती. तेव्हापासून तो कारागृहात होता. त्याला न्यायालयाने २४ फेब्रुवारी २०२१ रोजी जन्मठेप व ५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली होती. त्याचे वर्तन चांगले असल्याने त्याची खुल्या कारागृहात रवानगी करण्यात आली होती.

याबाबत कारागृह पोलीस शिपाई अविनाश गोविंद पवार यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कारागृह नियमानुसार सायंकाळी कारागृह बंदी गणती केली जाते. यावेळी अविनाश पवार यांना राजू दुसाने हा बंदी आढळून आला नाही. अधिकारी व अंमलदार यांनी येरवडा खुले कारागृहात सर्वत्र शोध घेतला असता तो मिळून आला नाही. त्यामुळे खुले कारागृहातून पळून गेल्याची फिर्याद देण्यात आली आहे. सहायक पोलीस फौजदार जायभाये तपास करीत आहेत.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!