Latest Marathi News
Ganesh J GIF

नवरीनेच दिली होणाऱ्या नवऱ्याच्या हत्येची सुपारी

पुणे जिल्ह्यात धक्कादायक प्रकार, पोलिसही थक्क, फोटो शुटही केले, लग्न घटिका समीप आली आणि...

पुणे – होणारा भावी नवरा पसंद नसल्याने त्याची हत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना पुणे जिल्ह्यात समोर आली आहे. विशेष म्हणजे लग्न काही दिवसांवर आले असता नवरीनेच याचा कट रचल्याचे धक्कादायक सत्य समोर आले आहे.

पुणे जिल्ह्याच्या दौंड तालुक्यातील हा भयानक प्रकार आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यात राहणाऱ्या मयुरी सुनील दांगडे या तरूणीचं लग्न कर्जत तालुक्यातील माही जळगाव येथील सागर जयसिंग कदम याच्याशी ठरलं होतं. मात्र मयुरीला होणार नवरा पसतं नव्हता. मयुरीला सागर सोबत लग्न करायचं नसल्याने तिने सागरला ठार मारून त्याचा काटा काढण्याचाच कट रचला. सागरला जीवे मारण्यासाठी मयुरी दांगडे आणि संदीप गावडे या दोघांनी तब्बल १ लाख ५० हजार रुपयांची सुपारी दिली. विशेष म्हणजे मयूरीने याबाबत कोणालाही थांगपत्ता लागू दिला नाही. तिने कोणाला शंका येऊ नये म्हणून प्रो वेडिंग शुट देखील केले होते. सागर हा कर्जत तालुक्यातील माही जळगाव येथील रहिवासी आहे. तो एका हॉटेलमध्ये कूक म्हणून काम करतो. २७ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी साडेसात वाजेच्या सुमारास तो कामावरून परतत असताना दौंड तालुक्यातील खामगाव फाट्याजवळील यवत पोलीस हद्दीतील एका हॉटेलजवळ काही लोकांनी त्याला अडवले. हल्लेखोरांनी सागरवर काठ्यांनी हल्ला केला. त्याला बेदम मारहाण केली आणि नंतर तेथून पळून गेले. गंभीर जखमी झालेल्या सागरने कसं तरी स्वतःला सावरत घटनेची पोलिसांना माहिती दिली. यानंतर पोलिसांनी तपास करत आदित्य शंकर दांगडे, संदीप दादा गावडे, शिवाजी रामदास जरे, सूरज दिगंबर जाधव आणि इंद्रभान सखाराम कोळपे यांना अटक केली. त्यावेळी सगळा प्रकार समोर आला. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता, त्याने हा गुन्हा मयुरी दांगडे आणि संदीप गावडे यांच्या सांगण्यावरून केल्याची कबुली दिली. परंतु कटाची सूत्रधार वधू अजूनही फरार आहे. पोलीस तिचा शोध घेत आहेत.

मुलीला तिचा भावी नवरा पसंत नसल्याने नकार द्यायचा सोडून, तिने थेट हत्या करण्याचा कट केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश माने करत आहेत.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!