
पुण्यात गुन्हेगारी वाढत असताना दिसत आहे. पुण्यात मागील काही दिवसांपासून महिलांवर होणाऱ्या अत्याचाराचं प्रमाण वाढलं आहे. त्यामुळे पुणे शहरात महिला असुरक्षित आहेत का?असा प्रश्न निर्माण झाला आहे. हडपसर परिसरात नऊ महिन्याच्या बाळाला घेऊन जाणाऱ्या महिलेच्या अंगावर पाणी टाकून अश्लील शिवीगाळ केली. तसेच तिचे फाडून असभ्य वर्तन करुन विनयभंगकेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी 48 वर्षीय व्यक्तीला अटक केली आहे.
याबाबत 20 वर्षीय महिलेने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन समीर अहमद अब्दुल कादीर शेख (वय-48 रा. हडपसर) याच्यावर आयपीसी 354(ब), 504 नुसार गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. ही घटना गुरुवारी (दि.4) सकाळी साडे दहा वाजण्याच्या सुमारास घडली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्य़ादी महिला त्यांच्या नऊ महिन्याच्या बाळाला घेऊन रस्त्यावरुन जात होत्या.त्यावेळी त्यांच्या घराजवळ राहणाऱ्या आरोपी समीर शेख याने इमारतीवरुन पाणी टाकले.हे पाणी महिलेच्या अंगावर पडले. त्यामुळे महिलेने याबाबत आरोपीकडे विचारणा केली असता त्याने महिलेसोबत वाद घातला.
तसेच अश्लील बोलून शिवीगाळ केली.त्यानंतर इमारतीच्या खाली येऊन फिर्यादी यांचा अंगावरील कपडे ओढून फाडले.समीर शेख याने स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करुन विनयभंग केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.महिलेने तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करुन आरोपीला अटक केली आहे.पुढील तपास पोलीस करीत आहेत.