मुंबईतल्या झोपडपट्टीतल्या मुलीची थक्क करणारी ग्लोबल भरारी
मलीशा खारवा बनली फॉरेस्ट इसेंशियल्सची ब्रॅन्ड एम्बेसेडर, चाैदा वर्षाच्या मुलीचा फॅशन जलवा
मुंबई दि २३(प्रतिनिधी)- मुंबईत धारावीच्या झोपडपट्टीत राहणाऱ्या १४ वर्षीय मलीशा खारवा हिची लक्झरी ब्युटी ब्रॅन्ड असलेल्या फॉरेस्ट इसेंशियल्सच्या नवीन कॅम्पेनसाठी ब्रॅन्ड एम्बेसेडर म्हणून निवड झाली आहे. मनात जिद्द असेल तर माणूस काहीही करू शकतो याचा प्रत्यय मलीशाच्या यशाने आला आहे. आता जगभरातील लोक तिचे कौतुक करत आहेत.
मलीशा खारवा मुंबईतील धारावी झोपडपट्टीत राहाते. तिचे वडील पार्ट्यांमध्ये विदूषक बनून लहान मुलांचं मनोरंजन करण्याचं काम करतात. मलीशानं इन्स्टाग्राम व्हिडीओच्या माध्यमातून आपल्या मॉडलिंग करिअरची सुरूवात केली. तिचे हे व्हिडीओ प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेता रॉबर्ट हॉफमन याने पाहिले. जेंव्हा २०२० मध्ये हॉलीवूड अभिनेता रॉबर्ट हॉफमॅननं मलीशाला शोधले होते, जेव्हा तो एका गाण्याचं शूटिंग करण्यासाठी मुंबईत पोहोचला होता. त्यानंतर त्यानं या मुलीसाठी नवीन इन्स्टाग्राम अकाउंट ओपन केले. आज तिचे दोन लाखाहुन जास्त फाॅलोअर्स आहेत. तिने ‘लिव्ह युवर फेयरीटेल’ या शॉर्ट फिल्ममध्येही काम केले आहे. आता तिला फॉरेस्ट एसेंशियल्सच्या मोहिमेची ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. फॉरेस्ट एसेंशियल्सने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला असून त्यात मलीशा त्यांच्या स्टोअरमध्ये प्रवेश करताना दिसत आहे. तिचा चेहऱ्यावरचा आनंद केवळ अवर्णीय असा आहे. या मुलीचा चेहरा तिची स्वप्ने सत्यात येताना पाहून आनंदाने उजळला आहे, या व्हिडिओला चार लाखांहून अधिक लाईक्स मिळाल्या आहेत. विशेष म्हणजे मलिशाने प्रियंका चोप्राबरोबर देखील एका फॅशन शोमध्ये रॅम्पवाॅक केले आहे. दरम्यान फ़ॉरेस्ट इसेंशियल्स युवा पिढीला मानसिकरित्या सक्षम बनवणेचा उद्देश घेऊन काम करते.
मलिशा सध्या शाळेत शिकत आहे, पण सोशल मीडियाच्या माध्यमातून काही पैसे मिळवून ती वडिलांना हातभार लावत आहे. तिला एक भाऊ आहे. त्याच्या शिक्षणाची जबाबदारी देखील मलिशाने घेतली आहे. झोपडपट्टीतून आलेल्या मुलीचे सध्या जग काैतुक करत आहेत.