प्रतिनिधी -चंद्रकांत दुडे – शिरूर, ता. ४ ऑक्टोंबरशिरूर-हवेली विधानसभा मतदारसंघात महायुतीच्या वज्रमूठीने विरोधकांना थरकाप उडवला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यामुळे भाजपचे मुख्य दावेदार प्रदीप कंद आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटातील शांताराम कटके यांनी आपल्या अर्जांची माघार घेतली आहे. महायुतीच्या या निर्णायक कृतीमुळे माऊली उर्फ ज्ञानेश्वर कटके यांचा विजय जवळपास निश्चित झाल्याचे मानले जात आहे.
माऊली कटके यांच्या विजयासाठी मी आता पूर्ण शक्तीनिशी प्रचारात उतरणार – प्रदीप कंद
महायुती च्या उमेदवाराचा विजयाचा निर्धार करत महायुतीची एकजुट आणि मतांमध्ये संघटित बळ निर्माण करण्याच्या दृष्टीने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांनी निर्णायक पावले उचलली आहेत. प्रदीप कंद यांनी माघार घेतल्यानंतर स्पष्ट केले की, “महायुतीच्या नेतृत्वासाठी आणि माऊली कटके यांच्या विजयासाठी मी आता पूर्ण शक्तीनिशी प्रचारात उतरतो आहे.”
उमेदवार अशोक पवार यांना जोरदार आव्हान: माऊली कटकेंचे जनसंपर्क आणि कार्य
शिरूर मतदारसंघातील सत्ताधारी आमदार अशोक पवार यांना कटके यांनी जनतेशी थेट संवाद साधत जोरदार आव्हान दिले आहे. माऊली कटके हे जनतेत ‘श्रावणबाळ’ आणि सेवाभावी नेते म्हणून ओळखले जातात. त्यांची साधी राहणी, मृदू भाषा, आणि जनसंपर्कातील तळमळ यांनी मतदारांवर ठसा उमटवला आहे.
विकासकामे करत माणुसकी जपणारे,कोणाविषयी आकस न ठेवता मदत करणारे म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
महायुतीची वज्रमूठ: ‘ज्ञानेश्वर उर्फ माऊली (आबा) यांच्या विजयासाठी आक्रमक मोहीम’ सुरू केली असून महायुतीचे उमेदवार ज्ञानेश्वर कटके यांच्या विजयासाठी सज्ज झाले असून, माघार घेणारे नेते देखील कटके यांच्या प्रचारात आक्रमकपणे उतरले आहेत. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी महायुतीचा उमेदवार निवडून आणण्याचा ठाम संकल्प केला आहे. यामुळे मतदारसंघातील राजकीय वातावरणात मोठे परिवर्तन घडले असून, महायुतीचा प्रचार अधिकच आक्रमक आणि धारदार होत आहे.
काटे की टक्कर: माऊली कटकेंचा प्रभाव वाढतोय!
राजकीय जाणकारांच्या मते, शिरूर मतदारसंघातील लढत आता थेट माऊली कटके विरुद्ध अशोक पवार अशी रंगणार आहे. एका बाजूला महायुतीचे शक्तिशाली एकत्रित प्रयत्न, तर दुसऱ्या बाजूला अशोक पवार यांची नियोजन बद्ध प्रचार यंत्रणा असून तीन वेळा आमदारकी लढवलेले पवार यांच्यावर कटके विजय मिळवतील असा विश्वास महायुतीचे कार्यकर्ते व नेते व्यक्त करत आहेत. जनतेच्या मनातील ‘आपला माणूस’ म्हणून माऊली कटके यांच्याविषयी निर्माण झालेली भावना आणि महायुतीची प्रखर मोहीम बघता, शिरूर मतदारसंघात महायुतीचा विजयाकडे सकारात्मक वाटचाल सुरू असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.