Latest Marathi News
Ganesh J GIF

महिलेने त्रिवेणी संगमावर अंघोळ केली ; नंतर रूममध्ये कपडे बदलत असताना तिला एक मोबाईल दिसला अन्..

पुणे  – त्रिवेणी संगमावर अंघोळ केल्यानंतर रुममध्ये कपडे बदलत असलेल्या महिलांचे मोबाईलवर शुटिंग केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तेथील पंडितच हे कृत्य करत असल्याचे आढळून आले आहे. लोणीकंद पोलिसांनी अमोल विजय टोणगावकर (वय ३६) अटक केली आहे.

याबाबत एका २९ वर्षाच्या महिलेने लोणीकंद पोलिसांकडे  फिर्याद दिली आहे. ही घटना तुळापूर येथील त्रिवेणी संगम येथे मंगळवारी दुपारी ३ वाजता घडली. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी, त्यांचे पती, दीर हे अमोल पंडित यांच्या सांगण्यावरुन तुळापूर येथील त्रिवेणी संगम येथे गेले. फिर्यादी व त्यांच्या पतीला पुजा झाल्यानंतर नदीत आंघोळ करुन आल्यानंतर फिर्यादीस पुजेच्या रुममध्ये कपडे बदलण्यास सांगितले. फिर्यादी त्या रुममध्ये कपडे काढत असताना भिंतीच्या कोपर्‍यात असलेल्या पंडितजीच्या बॅगेशेजारी उभा ठेवलेला एक मोबाईल फोन दिसला.

त्यावेळी फिर्यादी यांनी तो मोबाईल हातात घेऊन पाहिला असता तो मोबाईल फोन पंडितजीचा असल्याचे फिर्यादीस समजले. त्या मोबाईलमध्ये व्हिडिओ रेकॉडिंग चालू होते. फिर्यादी यांची खात्री झाली की, पंडितजी याने त्यांचे नग्न अवस्थेतील चित्रीकरण करण्यासाठी त्याच्या मोबाईलचे व्हिडिओ रेकॉडिंग चालू ठेवून भिंतीलगत मोबाईल उभा ठेवून त्यात रेकॉडिंग करुन विनयभंग (Molestation Case) केला. पोलिसांनी अमोल पंडित ऊर्फ टोणगावकर याला अटक केली आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!