Latest Marathi News
Ganesh J GIF

“दोन निष्पाप लोकांचा जीव घेणाऱ्या अपघाताची न्यायिक चौकशी व्हावी”; वडेट्टीवारांची मागणी

कल्याणीनगर येथे अल्पवयीन मुलाने भरधाव गाडी चालवत दोघांचा जीव घेतला आहे. या प्रकरणानंतर घटनास्थळी उपस्थित असलेल्या नागरिकांनी अल्पवयीन मुलाला चोप दिला आणि पोलिसांच्या ताब्यात दिले.मात्र काही वेळात त्या मुलाचा जामीन मंजूर करण्यात आला.बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल यांच्या 17 वर्षीय मुलाबाबत हे प्रकरण समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली. या घटनेनंतर फरार असलेल्या विशाल अग्रवालवर गुन्हा दाखल करत त्याला अटक करण्यात आली. या प्रकरणावरुन विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी दोन निष्पाप लोकांचा जीव घेणाऱ्या पुणे अपघाताची न्यायिक चौकशी व्हावी, अशी मागणी केली आहे.

विजय वडेट्टीवारांचे ट्विट
विजय वडेट्टीवारांनी ट्विटमध्ये लिहिले की, “दोन निष्पाप लोकांचा जीव घेणाऱ्या पुणे अपघाताची न्यायिक चौकशी व्हावी. पुणे पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह, त्यामुळे या प्रकरणी न्यायिक चौकशी व्हावी.पुणे अपघातातील आरोपीची अल्कोहोल चाचणी निगेटिव्ह असल्याचा अहवाल पोलिसांनी दिला आहे. अल्पवयीन असलेला आरोपी दारूत पित असल्याचे CCTV फुटेज असून ही हा अहवाल आल्याने पोलिसांच्या तपासावर प्रश्न चिन्ह उपस्थित होत आहे.”
“अल्पवयीन आरोपीला दारू कशी उपलब्ध झाली? रजिस्ट्रेशन नसलेली गाडी पुण्यातील रस्त्यावर कशी आली? नियम डावलून बार आणि पब सुरू होते का? होते तर त्यांच्यावर कारवाई का नाही? या प्रश्नांचा तपास न करता आरोपीला निर्दोष सिद्ध करण्यासाठी जणू पुणे पोलिसांचा तपास असल्याचे चित्र आहे. आरोपी अल्पवयीन आहे हे माहीत असताना त्याच्या वडिलांना अटक करण्यात इतका वेळ का लागला? म्हणूनच सदर घटनेची न्यायिक चौकशी व्हावी आणि या प्रकरणात पुणे पोलिसांची सुद्धा चौकशी व्हावी ही आमची मागणी आहे,” असे विजय वडेट्टीवारांनी म्हंटले आहे.

नेमकं काय घडलं?
सदरील अल्पवयीन मुलाने मित्रांसोबत एका हॉटेलमध्ये पार्टी केली. यानंतर तो पबमध्ये गेला होता. पार्टी संपल्यावर चालकाला शेजारच्या सीटवर बसवले होते. मद्याच्या नशेत त्याने गाडी भरधाव चालवली. ट्रम्प टॉवर समोर आल्यावर त्याचे गाडीवरचे नियंत्रण सुटून अपघात झाला. त्याच्या वडिलांनी नुकतीच ही आलिशान कार विकत घेतली होती, अशी माहिती येरवडा पोलिसांनी दिली.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!