भाजपाचे ‘हे’ आमदार व्हिडिओ गेम खेळण्यात आणि तंबाखू मळण्यात दंग
विधानसभेतील भाजप आमदारांचा तो व्हिडिओ व्हायरल, विरोधक आक्रमक
उत्तर प्रदेश दि २५(प्रतिनिधी)- लोकप्रतिनिधींकडे जनतेच्या कल्याणाची जबाबदारी असते. त्यासाठी त्यांना विधानसभेत पाठवले जाते. पण एक भाजप आमदार चक्क विधानसभेत तंबाखू मळताना आणि व्हिडिओ गेम खेळताना आढळून आला आहे.याचा एक व्हिडिओही व्हायरल झाला आहे.त्यामुळे नवा वाद निर्माण झाला. हे दोन्ही आमदार उत्तर प्रदेशमधील आहेत.
हा व्हिडिओ २२ सप्टेंबरचा आहे. यात उत्तर प्रदेशमधील विधानसभेत भाजपाचे झाशीचे आमदार रवी कुमार शर्मा
तंबाखूचे सेवन करत होते तर दुसरे महोबाचे भाजप आमदार राकेश गोस्वामी मोबाईलमध्ये व्हिडीओ गेम खेळण्यात व्यस्त होते. या व्हि़डीओची सोशल मीडियावर प्रचंड चर्चा होत आहे. अधिवेशनात जनतेच्या प्रश्नावर आवाज उठवायचा सोडून ते टाईपपास करत असल्याने नाराजीचा सुर उमटत आहे. समाजवादी पक्षाकडून हे व्हिडीओ व्हायरल करण्यात आले आहेत. या व्हिडीओबाबत भाजपकडून अद्याप कोणतेही स्पष्टीकरण आलेले नाही. तर भाजपकडे जनतेच्या प्रश्नांची उत्तरेही नाहीत. या लोकांनी विधानसभेला मनोरंजनाचे ठिकाण बनवलं आहे. भाजपचे आमदार सभागृहाच्या प्रतिष्ठेला कलंक लावत आहेत. हे अतिशय निंदनीय आणि लज्जास्पद असल्याचा आरोप समाजवादी पार्टीने केला आहे.
सदन की गरिमा को तार-तार कर रहे भाजपा विधायक!
महोबा से भाजपा विधायक सदन में मोबाइल गेम खेल रहे, झांसी से भाजपा विधायक तंबाकू खा रहे।
इन लोगों के पास जनता के मुद्दों के जवाब हैं नहीं और सदन को मनोरंजन का अड्डा बना रहे।
बेहद निंदनीय एवं शर्मनाक ! pic.twitter.com/j699IxTFkp
— Samajwadi Party (@samajwadiparty) September 24, 2022
उत्तर प्रदेशमध्ये सध्या विधानसभेचे अधिवेशन अनिश्चित काळासाठी थांबविण्यात आली आहे.पण सभागृहाबाहेरही सत्ताधारी आणि विरोधकात आरोप प्रत्यारोप सुरु आहेत.त्यातच समाजवादी पक्षाच्या नव्या आरोपांनंतर भाजप काय उत्तर देणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत असुन अनेक कमेंट केल्या जात आहेत.
— Samajwadi Party (@samajwadiparty) September 24, 2022