
‘या’ अभिनेत्रीने माझे कपडे फाडून व्हिडिओ काढायचा प्रयत्न केला
प्रसिद्ध अभिनेत्रीवर मोलकरणीचे गंभीर आरोप, छळ आणि मानसिक त्रास दिल्याचा आरोप करत तक्रार दाखल, सिनेसृष्टीत खळबळ
चेन्नई – बॉलिवूड आणि दक्षिणेतील चित्रपटांमध्ये झळकलेली अभिनेत्री डिंपल हयाती पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. डिंपल हयाती आणि तिचा पती विक्टर डेविड याच्या विरोधात घरकाम करणाऱ्या दोन सेविकांनी गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे सिनेसृष्टीत मोठी खळबळ उडाली आहे.
ओडिशातील रायगड जिल्ह्यातील 22 वर्षीय प्रियंका बिबर ही डिंपलच्या बंजारा हिल्स येथील वेस्टवुड अपार्टमेंटमध्ये काम करीत होती. तिने पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीत सांगितले की, ती जेव्हापासून डिंपलच्या घरी कामावर रुजू झाली तेव्हापासून तिचा तिथे छळ केला जात होता. पण कामाची गरज असल्यामुळे ती हे सहन करत होती. प्रियंकाचा दावा आहे की तिला पुरेसे जेवण दिले जात नव्हते. मोलकरणीच्या म्हणण्यानुसार, त्या अभिनेत्री आणि नवऱ्याने तरुणीला असंही सांगितलं की, तिचं आयुष्य त्यांच्या बुटांच्या किमतीलाही किंमत नाही. मोलकरणीने सांगितल्यानुसार, 29 सप्टेंबर रोजी त्यांच्यामध्ये वाद झाला. डिंपल आणि डेव्हिड यांनी मोलकरणीसोबत गैरवर्तण केलं आणि आई – वडिलांना जीवे मारण्याची धमकी दिली. जेव्हा तरुणीने व्हिडीओ रेकॉर्ट करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा डेव्हिडने फोन हिसकावून घेतला आणि तिच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला.मोलकरीणाने असाही दावा केला की, हाणामारीदरम्यान तिचे कपडे फाटले होते आणि निर्वस्त्र व्हिडीओ शूट करण्याचा प्रयत्न करण्यात आला असा आरोप केला. अखेर मोलकरणीने तिच्या एजंटच्या मदतीने पोलिसांपर्यंत पोहोचत तक्रार दाखल केली. पीडित मोलकरणीच्या तक्रारीवरून फिल्मनगर पोलिसांनी विविध कलमा अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी डिंपल हयात किंवा तिच्या पतीकडून अद्याप कोणतेही विधान आलेले नाही. सध्या तपास सुरू असून आवश्यक त्या कायदेशीर कारवाया करण्यात येतील असं त्यांनी म्हटले आहे.
डिंपल ही साऊथ इंडस्ट्रीमधील लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिने २०१७ साली ‘गल्फ’ या तेलुगू सिनेमातून पदार्पण केलं होतं. त्यानंतर ती ‘अतरंगी रे’, ‘देवी २’, ‘खिलाडी’, ‘युरेका’ या सिनेमांमध्येही झळकली आहे. पण सध्या सोशल मीडियावर तिच्यावर मोठी टीका होताना पहायला मिळत आहे.