Latest Marathi News
Ganesh J GIF

या महिला अॅस्ट्रोची विमान अपघाताची भविष्यवाणी ठरली खरी

सहा महिन्यापूर्वीच दिली होती अपघाताची कल्पना, कोण आहे शर्मिष्ठा?

अहमदाबाद – अहमदाबाद विमान अपघाताने संपुर्ण देश शोकसागरात आहे. आत्तापर्यंत २६५ जणांचा मृत्यू झाला असून अनेक जखमींवर उपचार सुरु आहेत. त्यातच आता अॅस्ट्रो शर्मिष्ठा या महिलेचे भविष्यवाणीची व्हायरल झाली आहे.

अहमदाबाद विमान अपघातात एक प्रवासी वगळता इतर सर्वांचा मृत्यू झाला आहे. तर ज्या बिल्डिंगवर हे विमान कोसळले तेथील डाॅक्टरांचाही मृत्यू झाला आहे. मात्र त्याच दरम्यान, विमान अपघाताबाबत भविष्यवाणी झालेली एक पोस्ट सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. प्रसिद्ध ज्योतिषी शर्मिष्ठा यांनी विमान अपघाताबाबत भविष्यवाणी करणारे ट्विट ६ महिन्यापूर्वी केलं होते. २९ डिसेंबर २०२४ रोजी केलेल्या ट्विट मध्ये त्यांनी म्हंटल कि, २०२५ मध्ये विमान वाहतूक क्षेत्र चांगले काम करेल, परंतु विमान अपघाताच्या बातम्या आपल्याला धक्का देऊ शकतात, विमान वाहतूक क्षेत्रात थोडी सुधारणा आधीच सुरू झाली आहे. जेव्हा गुरु ग्रह मृगशिरा आणि अर्द्राच्या मिथुन भागात असेल आणि दरमहा सुमारे ६.५ अंश वेगाने असेल, तेव्हा विमान वाहतूक भरभराटीला येईल परंतु सुरक्षितता कमी असेल असं ट्विट ज्योतिषी शर्मिष्ठा यांनी केलं होते. यानंतर ५ जूनला पोस्ट केलेल्या भविष्यवाणीमध्ये म्हटलं होत की, “टाटा हैदराबादमध्ये राफेल विमानाचे फ्यूजलेज बनवणार आहेत. हा फक्त विमानचालन विस्तार आहे, येत्या दोन वर्षांत इस्रो अवकाश आणि उपग्रह अभियांत्रिकी, अंतराळ पर्यटनात जगाला आश्चर्यचकित करेल. गेल्या वर्षी नक्षत्र संक्रमणाद्वारे हे भाकीत केले होते. २०२५ मध्ये विमान अपघात आणि विमान वाहतुकीत विनाश होण्याची भाकित मी अजूनही उंचावत आहे”. तिने केलेल्या या पोस्टनंतर १२ जूनला म्हणजेच अवघ्या ७ दिवसांनी एअर इंडियाच्या विमानाचा अपघात अहमदाबादमध्ये झाला. त्यामुळे आता त्यांची पोस्ट मोठ्या प्रमाणात चर्चेत येत आहे. गुजरातमधील विमान दुर्घटनेनंतर सोशल मीडियावरील अनेकांनी ज्योतिषी शर्मिष्ठा यांचं जुनं ट्विट शोधण्यास सुरुवात केली. त्यानंतर बघता बघता शर्मिष्ठा यांचं ट्विट व्हायरल झालं. अनेकांनी याबद्दल आश्चर्य व्यक्त केले आहे. शर्मिष्ठांचे ट्विट पाहून अनेक जण चकित झाले आहे.

 

https://x.com/AstroSharmistha/status/1873303196510421458

अहमदाबाहून लंडनला जाणा-या विमानात २४२ प्रवाशांसह १२ क्रू मेंबर्सचा समावेश होता. यावेळी विमानात १६९ भारतीय,५२ ब्रिटीश प्रवासी होते, तर ७ पोर्तुगीज आणि एका कॅनडियन प्रवाशाचाही समावेश होता. यात फक्त एक प्रवासी वाचला आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!