
प्रसिद्ध अभिनेत्रींच्या घरावर या कुख्यात गँगचा गोळीबार
बॉलीवूड हादरले, या कारणामुळे झाला गोळीबार, या गॅंगने पोस्ट करत स्वीकारली जबाबदारी, नेमके कारण काय?
बरेली – बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानीच्या बरेली येथील घराबाहेर गोळीबार झाला. गोल्डी ब्रार-रोहित गोदारा यांनी या गोळीबाराची जबाबदारी घेतली आहे. बरेलीतील सिव्हिल लाईन्स येथील दिशा पटानीच्या घरी गोळीबार झाला आहे. पण गोळीबार कशामुळे झाला हे अद्याप स्पष्ट झाले नाही.
दिशा पटानीच्या बरेली येथील घराबाहेर रात्री ही धक्कादायक घटना घडली. सिव्हिल लाईन्स परिसरातील त्यांच्या घराच्या मुख्य दरवाज्यावर तसेच भिंतीवर दोन अज्ञात इसमांनी मोटरसायकलवरून येऊन सलग चार-पाच फायरिंग केली. या वेळी घरात दिशा पटानीचे वडील व निवृत्त एसपी जगदीश पटानी राहत होते. सुदैवाने या हल्ल्यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. या हल्ल्याची जबाबदारी कुख्यात गँगस्टर रोहित गोदारा आणि गोल्डी ब्रार गँगने स्वीकारली आहे. फेसबुकवर पोस्ट टाकत या गँगने थेट धमकी दिली असून, दिशा पटानीची बहीण खुशबू पटनीने काही महिन्यांपूर्वी केलेल्या वक्तव्याचा बदला घेतल्याचा दावा त्यांनी केला आहे. पोस्टमध्ये स्पष्ट चेतावणी देत संत आणि धर्मांविरोधात बोलणाऱ्यांना गंभीर परिणाम भोगावे लागतील, असे म्हटले आहे. अनिरुद्धाचार्य यांनी लिव-इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या महिलांबाबत वादग्रस्त विधान केले होते. त्यावरून खुशबू पटनी संतप्त झाली होती आणि तिने त्यांच्यावर कठोर शब्दांत टीका केली होती. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर मोठी खळबळ माजली होती. गँगस्टर रोहित गोदारा आणि गोल्डी ब्रार गँगने सोशल मीडियावर पोस्ट करत हल्ल्याची जबाबदारी घेतली असून या पोस्टमध्ये काही व्यक्तींची नावे घेतली आहेत. चित्रपटसृष्टीला इशारा देण्याचा प्रयत्न केल्याचे दिसते. मात्र, या संदेशाची सत्यता पोलिसांकडून अद्याप तपासली जात आहे. दरम्यान, आम्ही सनातनी आहे आणि आम्ही सर्व साधूसंतांचा सम्मान करतो. पण खुशबूचं वक्तव्य मोडून तोडून दाखवण्यात आल्याने आमच्यावर दबाव टाकण्याचा हा प्रयत्न केला आहे, असा दावा दिशा पटानीच्या वडिलांनी केला आहे.
या पार्श्वभूमीवर बरेली पोलिसांनी अभिनेत्रीच्या घराची सुरक्षा वाढवली आहे. प्रशासनाने नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले असून संपूर्ण तपास पूर्ण होईपर्यंत संयम पाळण्याचे आवाहन केले आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले.