
इतिहासकार इंद्रजीत सावंत यांना धमकी, छत्रपतींबद्दल वादग्रस्त विधान
धमकीचे रेकार्डींग व्हायरल, ब्राम्हणांच्या मुख्यमंत्र्यांच्या शासनात काम करत आहात, म्हणत...
कोल्हापूर – इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना जीवे मारण्याची धमकी आली आहे. ‘छावा’ चित्रपटावर भूमिका मांडताना ब्राम्हणद्वेष पसरवल्याचा आरोप करत प्रशांत कोरटकर नावाच्या व्यक्तीने फोनवरून धमकी दिल्याची माहिती इंद्रजित सावंत यांनी फेसबुक पोस्टमधून दिली आहे.
इंद्रजित सावंत यांनी सांगितले की, साधारण १२ वाजता धमकीचा फोन आला होता. ती व्यक्ती शिव्या घालून जातीवाचक बोलत होती. छत्रपती शिवाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख केला. हा महाराष्ट्र पेशव्यांचा होत आहे का? अशी खंत वाटते. राज्याच्या गृहमंत्रालयाकडून संबंधितावर कारवाई करावी. त्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नाव घेतले आहे. त्यांनी यावर कारवाई करून आपण सर्व समाजाचे आहोत हा संदेश द्यावा, असे सावंत म्हणाले आहेत. प्रशांत कोरटकर या व्यक्तीनं आपल्याला जीवे मारण्याची धमकी देत अर्वाच्य शिवीगाळ गेल्याचं म्हटलं. सदर प्रकरणी दोन फोन आल्याची प्राथमिक माहिती असून, पहिला फोन आल्यानंतर त्यांनी या प्रकरणाकडे गांभीर्यानं लक्ष दिलं नाही. पण, दुसरा फोन आला तेव्हा मात्र सर्व मर्यादा ओलांडण्यात आल्या. जिथं ‘घरी येऊन बघून घेईन’, अशा भाषेत त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. दरम्यान या पोस्टमध्ये त्यांनी प्रशांत कोरटकर या व्यक्तीने आपल्याला जीवे मारण्याची धमकी देत अर्वाच्च शिवीगाळ केल्याचे म्हटले आहे. ब्राह्मणद्वेष पसरवण्या प्रकरणीचा रोष फोन करणाऱ्या व्यक्तीने धमकी देताना बोलून दाखवला, असल्याचे त्यांनी सांगितले. यामुळे प्रशांत कोरटकर ही व्यक्ती कोण आहे याचा तपास घेण्याची मागणी इतिहासकारांकडून करण्यात आली आहे.
इंद्रजित सावंत धमकी प्रकरणी मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश दिले आहेत. तर दुसरीकडे कोरटकर यांनी हे आरोप नाकारले आहेत. माझं नाव वापरून कुणीतरी फोन केला. अशा प्रकारची धमकी देण्याचा प्रश्नच नाही, असे प्रशांत कोरटकर म्हणाले आहेत.