
छत्रपती शिवरायांचं चित्र गोंदलं म्हणून हात तोडण्याची धमकी
वाल्मिक कराडच्या काळ्या कारनाम्यांची यादी समोर, बीडचा गाॅडफादर होण्याचे स्वप्न, मंत्रीपदाचीही आस?
बीड – मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख खून प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड याचे आणखी कारनामे पुढे येऊ लागले आहेत. मागे अडीच वर्षे वाल्मिकसोबत काम केलेल्या विजयसिंह बाळा बांगर यांनी मोठे गाैप्यस्फोट करत कराडवर गंभीर आरोप केले आहेत.
विजयसिंह उर्फ बाळा बांगर यांनी पत्रकार परिषद घेत धक्कादायक खुलासे केले आहेत. बाळा बांगर यांच्या मनगटावर छत्रपती शिवाजी महाराजांचं चित्र गोंदलेलं आहे. याबाबत कराडने प्रश्न विचारला यावर आपण छत्रपती शिवाजी महाराज आणि संत भगवानबाबा यांच्या विचारांवर चालत आहोत, त्यामुळे हे चित्र गोंदलेलं आहे असं बांगर यांनी सांगितलं. परंतु वाल्मिक कराडने एका बाईमार्फत हे चित्र काढण्यास सांगितलं. नाहीतर हात तोडून पाटोद्याच्या चौकात लटकवू, अशी धमकी दिल्याचा दावा बांगर यांनी केला आहे. बाईमार्फत बाळा बांगर यांना खोट्या बलात्काराच्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देण्यात आलेली होती. शिक्षण संस्था दे नाहीतर गोळ्या झाडून आत्महत्या कर, तसं केलं नाही तर खोट्या गुन्ह्यात अडकवण्याच्या धमक्या देण्यात आल्याचा आरोपही बांगर यांनी केला आहे. आपण २०२२ ते २०२४ या काळात बाळा बांगर यांनी वाल्मिक कराडसोबत काम केलं आहे. दोन अडीच वर्षे आम्ही एका विचारानं काम केलं. पण नंतर विचारांमध्ये दुफळी निर्माण झाली. कारण कराडने बांगर कुटुंबावरच नोव्हेंबर २०२४ मध्ये गुन्हे दाखल केले. पण त्यापूर्वीच २०२३-२४ मध्ये वाल्मिक कराड हा वेगवेगळ्या लोकांवर स्वतः पोलिसांकरवी गुन्हे दाखल करत होता. अशा कित्येक लोकांचा आपण जीव वाचवला आहे. त्यासाठी आपण वाल्मिकसोबत भांडलो. पण वाल्मिक कराड हा विकृती बनला होता. असं बाळा बांगर यांनी सांगितलं आहे. माझ्या ७० वर्षीय वडिलांवर आणि आईवर गोळीबार केल्याचे गुन्हे वाल्मिक कराडनं दाखल केले आहेत. याचं एकमेव कारण होतं की मी वाल्मिक कराडपुढं झुकावं आणि त्याच्याशी पुन्हा जुळवून घ्याव, पण आपण झुकलो नाही, असे बांगर यांनी सांगितले.
वाल्मिक समाजसेवक होता तर त्यानं खंडण्या का घेतल्या? त्याला धनंजय मुंडेनंतर जिल्ह्याचा गॉडफादर व्हायचे होतं, त्याला पुर्ण मराठवाडा ताब्यात घ्यायचा होता. इतकंच नाही त्यालाच नंतर मंत्री व्हायचे होते, असा खळबळजनक आरोपही विजयसिंह बाळा बांगर यांनी केला आहे.