Latest Marathi News
Ganesh J GIF

पुण्यात जमिनीच्या वादातून पिस्तुल दाखवत धमकी

पिस्तुल दाखवतानाचा व्हिडिओ व्हायरल, शेतकरी आक्रमक, वकिलाचा वेगळाच दावा, प्रकरण काय?

पुणे – पुण्यातील जमीनीचे भाव गगनाला भिडले आहेत. नापीक जमिनीला देखील सोन्याचा भाव आला आहे. पण या जमिनीमुळे अनेक वाद देखील झाले आहेत. पुण्यातील मिळशी तालुक्यात जमिनीच्या वादातून बंदूक दाखवत धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे.

मुळशी येथे जमिनीच्या ताब्यावरून काही जणांनी शेतकऱ्याला पिस्तूल दाखवत दमदाटी केल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. शब्बीर करीमभाई मुलाणी यांनी याबाबत तक्रार दिली असून वकील संदीप भोईर यांनी धमकी देण्याचे त्यांनी म्हटले आहे. तर वकील संदीप हिरामण भोईर यांनी देखील शब्बीर मुलाणी आणि त्यांचे इतर चार ते पाच साथीदारांच्या विरोधात तक्रार दिली आहे. १६ एकर च प्रकरण हे मुंबई उच्च न्यायालयात प्रलंबित आहे. ते जैसे ते आहे. असं असताना आरोपी हे बेकायदेशीर जमाव जमवून अनधिकृतरित्या मिळकतीचे कंपाऊंडचे नुकसान करून ट्रॅक्टरने नांगरणी करत होते. त्यांना आम्ही समजावण्यासाठी गेल्यानंतर याचाच राग मनात धरून त्यांनी लाकडी दांडके आणि कुऱ्हाड घेऊन दगडफेक केल्याची तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणाची माहिती मिळताच हिंजवडी पोलिस घटनास्थळी गेले. याबाबत चौकशी करून पुढची कारवाई केली जाणार असल्याची माहिती हिंजवडी पोलिसांनी दिली आहे. पण या प्रकरणामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

 

कासारसाई येथील शब्बीर मुलाणी आणि वाडकर यांच्यात जमिनीवरून वाद सुरू आहे. मुलाणी यांची काही जमीन वाडकर यांनी खरेदी केली आहे. मात्र ही जमीन कुळकायद्यात मोडत असल्याने यासाठी गेल्या १० ते १२ वर्षांपासून वाद सुरू असून, तो वाद न्यायालयात गेला आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!