Latest Marathi News
Ganesh J GIF

थरारक! पुण्यात भरधाव पिकअपने अनेक वाहनांना उडवले

थरारक अपघात सीसीटीव्हीत कैद, सुसाट चालकाने अनेक वाहनांना उडवले, चाक निखळले आणि...

पुणे – पुण्यात वाहनांच्या अपघातांच्या प्रमाणामध्ये चिंताजनक वाढ झाली आहे. अशातच एका थरारक अपघाताची एक घटना उघडकीस आली आहे. तसेच या अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे.

ताथवडे-पुनावळे रस्त्यावर घडलेला हा अपघात सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. शुक्रवारी साडे बाराच्या सुमारास हा अपघात झाला. भरधाव वेगात असलेल्या पिकअपने आधी उजव्या बाजूने येणाऱ्या एका चारचाकी वाहनाला धडक दिली. या धडकेत पिकअपचे चाक निखळले आणि चालकाचा गाडीवरील ताबा सुटला. त्यानंतर पिकअपने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या दुचाकीलाही धडक दिली. या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, या अपघातात एक महिला गंभीर जखमी झाली आहे. चालक मद्यधुंद अवस्थेत होता, असे स्थानिकांचे म्हणणे आहे. वाकड पोलिसांनी चालकाला ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. दरम्यान या अपघाताचा थरार शेजारील पेट्रोल पंपाच्या सीसीटीव्हीत कैद झाला आहे.

 

पुणे शहरात अपघातांचं सत्र सुरूच आहे. भरधाव वाहनांमुळे अपघात होत असल्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. पुण्यातील चाकण शिक्रापूर रोडवर काही दिवसापुर्वी अपघाताचा मोठा थरार घडला होता. त्यात कंटनेर चालकाने अनेक वाहनांना उडवले होते. यात एकाचा मृत्यू झाला होता.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!