Latest Marathi News
Ganesh J GIF

देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांवर काळाचा घाला.. 14 जणांचा जागीच मृत्यू

MAHARASHTRA KHABAR NEWSआसाममधील डेरगावमध्ये भीषण अपघात झाला असून अपघातात 14 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 27 जण गंभीर जखमी आहेत. बुधवारी (3 जानेवारी) सकाळी 45 जणांना घेऊन जाणारी बस आणि ट्रक यांच्यात भीषण टक्कर झाली आणि अपघात झाला. घटनेची माहिती मिळताच पोलीस पथक घटनास्थळी पोहोचलं. तात्काळ बचावकार्य सुरू करण्यात आलं आहे. बसमधील जखमींना स्थानिक लोकांच्या मदतीनं बाहेर काढण्यात आलं आणि स्थानिक रुग्णालयात नेण्यात आलं. अपघातातील अनेकांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळत आहे.
देवदर्शनाला निघालेल्या बसचा भीषण अपघात
आसाममधील गोलाघाट जिल्ह्यातील डेरगावजवळ बुधवारी पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झाला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बसमधील सर्व 45 जण सहलीसाठी जात होते. आसाम तिनसुकियामधील तिलिंगा मंदिरात दर्शनासाठी जायचं होतं, मात्र वाटेत डेरागाव येथे बस समोरून येणाऱ्या ट्रकला धडकली. दोन्ही वाहनांची धडक खूप भीषण होती. दोन्ही वाहानांचा चक्काचूर झाला. तसेच, बसमधील 14 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. तर बसमधून प्रवास करणारे इतर 27 जण गंभीर जखमी आहेत, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!