Latest Marathi News
Ganesh J GIF

सासरच्या छळाला कंटाळून तरुणीने संपवले जीवन

हुंडाबळीच्या घटना सुरूच, पतीची हाव सुटेना, राहत्या घरी संपवलं आयुष्य, दिव्यासोबत नेमके काय घडले?

पुणे – मे महिन्यात वैष्णवी हगवणे हिने सासरच्या छळाला कंटाळून आत्महत्या केली आहे. यामुळे संपूर्ण राज्यभरातून रोष व्यक्त करण्यात येत आहे. पण अजूनही अशा घटना थांबण्याचे नाव घेत नाहीत. कारण वैष्णवीची घटना ताजी असतानाच आणखी एक आत्महत्येची घटना समोर आली आहे. त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.

दिव्या हर्षल सूर्यवंशी या विवाहित महिलेने हुंड्याच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली. वाकडमधील W-57 सोसायटीत दिव्या सूर्यवंशी यांचा मृतदेह राहत्या घरात गळफास लागलेल्या अवस्थेत आढळला आहे. ही आत्महत्या नसून खून असून, तिच्या पतीसह सासरच्यांनी हुंड्यासाठी छळ केला आणि खून केला, असा आरोप दिव्याच्या नातेवाईकांनी केला आहे. मूळची धुळे जिल्ह्यातील तसेच शेतकरी कुटुंबातील असलेली दिव्या भाऊसाहेब खैरनार ही उच्चशिक्षित तरुणी होती. तिचा विवाह जवळपास ३ वर्षांपूर्वी हर्षल शांताराम सूर्यवंशी या आयटी इंजिनिअर तरुणासोबत झाला होता. हर्षल सूर्यवंशी वारंवार दिव्याच्या कुटुंबीयांकडे सोन्याच्या दागिन्यांची मागणी करत होता. तसेच त्याने घरातील फर्निचर बनवण्यासाठी माहेरून पैसे आणण्यासाठी तगादा लावला होता. यासाठी तो दिव्याचा मानसिक आणि शारीरिक छळ करत होता, असा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला आहे. दिव्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या हर्षल आणि त्याच्या कुटुंबीयांना विरोधात कठोर कायदेशीर कारवाई करून त्यांना कठोरात कठोर शिक्षा देण्यात यावी अशी मागणी मृतक दिव्याच्या नातेवाईकांनी केली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, हुंडाबळीच्या घटनांवरून पुन्हा एकदा संतापाची लाट पसरली आहे.

दिव्याच्या मृत्यूप्रकरणी वाकड पोलिसांनी तपास सुरू केला आहे. मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला आहे. दिव्याच्या कुटुंबांच्या तक्रारीनुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, तपास सुरू केला आहे. प्राथमिक तपासात पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असून, सासरच्या मंडळींची चौकशी सुरू आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!