
पुण्यात सासरच्या छळाला कंटाळून सीमाने उचललं टोकाचं पाऊल
सासरचा जाच संपेना, खोटे बोलून लग्न केल्याची सल, बसून खाणारा नवरा, आणि सीमाचा अनपेक्षित निर्णय
पुणे – सासरी होणाऱ्या त्रासाला कंटाळून एका विवाहितेने आत्महत्या केली आहे. पुण्यातील फुरसुंगी परिसरात ही घटना घडली आहे. खोटे बोलून लग्न केल्याने विवाहिता आपल्या पतीकडे नोकरी करण्याचा आग्रह करत होती. त्यामुळे तिचा छळ केला जात होता. या सततच्या छळाला कंटाळून विवाहितेने आत्महत्या केली आहे.
सीमा अक्षय राखपसरे असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. पती कोणताही काम धंदा न करता घरात बसून असतो मुलांसाठी बचत गटामार्फत काम करत असतानाही सासरी होणार्या शारीरीक व मानसिक छळाला कंटाळून विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार सीमाचे अक्षय राखपसरे याच्यासह ६ जुलै २०२० रोजी लग्न झाले होते. अक्षयचे सर्व्हिस सेंटर असल्याचे लग्नाच्या वेळी सांगण्यात आले होते. त्यांना ३ वर्षाचा मुलगा व दीड वर्षाची मुलगी आहे. अक्षय हा काही कामधंदा करत नसल्यामुळे तिचा व तिच्या मुलांचा खर्च तिचे वडिल खलसे हे करत होते. अक्षय राखपसरे हा गुंड प्रवृत्तीचा असल्याने सीमा हि घरातील वाद त्यांना सांगत नसे. तिच्या घराचा पूर्ण कारभार तिचे चुलत सासरे वसंत राखपसरे हे पाहत होते. किरकोळ कारणावरुन अक्षय सीमा हिला मारहाण करत असे. आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी पैसे लागणार आहे. कोठेतरी नोकरी शोधा, असे ती म्हणत असे. त्यावरुन तिचे व तिच्या सासरच्या लोकांशी सतत वाद व्हायचे. त्यावरुन तिचा पती तिला मारहाण करायचा. सीमाची मोठी जाऊ पुजा ही सासुची सख्खी भाची असल्यामुळे ती सतत सीमाच्या चुगल्या करत असे. सीमा हिने बचत गट काढून किराणा मालाचे दुकान टाकले होते. तिचा व तिच्या मुलांसाठी कपडेलत्ता व खर्चासाठी पैसे तिचे वडिल पाठवत असत. ६ ऑगस्ट रोजी त्यांना मुलीच्या चुलत दिराच्या मोबाईलवरुन फोन आला. तुमच्या बहिणीच्या दशक्रिया विधीला सीमाला यायला मिळाले नाही म्हणून तिने फाशी घेतली असल्याचे त्यांनी सांगितले. हे समजल्यावर ते तातडीने पुण्यात आले. पण त्यांना मुलीची तब्येत ठीक आहे, भेटायची आवश्यकता नाही, असे सांगून भेटू दिले नाही. डॉक्टरांनी मुलीचा मृत्यू झाल्याचे सांगितले. सासरी होणार्या शारीरीक व मानसिक छळाला कंटाळून सीमा हिने फॅनला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.
सीमाचे वडील वडिल रवी हिरामण खलसे यांनी फुरसुंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी पती अक्षय सुरेश राखपसरे, चुलत सासरे वसंत राखपसरे, सासु आशाबाई सुरेश राखपसरे, दीर अविनाश सुरेश राखपसरे, जाऊ पुला अविनाश राखपसरे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक बापुसाहेब खंदारे करीत आहेत.