Latest Marathi News
Ganesh J GIF

बायकोच्या सततच्या त्रासाला कंटाळून तरुणाने घेतला टोकाचा निर्णय

सुसाईड नोट लिहीत केली आत्महत्या, सासरा आणि मामेसासऱ्यावर गंभीर आरोप, राणीने भागवातला का छळले?

बीड – सासरच्या जाचाला कंटाळून किंवा सासरच्या होणाऱ्या त्रासामुळे मुलीने, सुनेने जीवन संपवल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. पण बीडमध्ये बायको आणि सासुरवाडीच्या त्रासाला कंटाळून तरूणाने आत्महत्या केली आहे.

भागवत अंकुश राठोड असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. ही घटना बीड जिल्ह्याच्या गेवराई तालुक्यातील तलवाडा पोलीस ठाणे हद्दीत घडली आहे. मुलाने आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीवरुन तलवाडा पोलीस ठाण्यात तीन जणांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. आई सुनिता राठोड यांनी तलवाडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या तक्रारीनुसार भागवत राठोड याला पत्नी, सासरा आणि मामेसासरा हे मानसिक त्रास देत होते. त्यामुळे तो नैराश्यात होता असं म्हटलं आहे. त्यातूनच त्याने 1 ऑक्टोबर रोजी राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी त्याने एक चिठ्ठीही लिहून ठेवली, ज्यात होणाऱ्या त्रासाचा उल्लेख करण्यात आला आहे. मुलाच्या मृत्यूच्या दुःखातून सावरल्यानंतर भागवतच्या आईने पोलीस स्टेशनमध्ये ही तक्रार नोंदविली आहे. दरम्यान, याप्रकरणी त्याची पत्नी राणी राठोड, सासरा संतोष राठोड आणि मामेसासरा दत्ता राठोड यांच्या विरोधात तलवाडा पोलीस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

याप्रकरणी, पोलीस अधिक तपास करत आहेत. मात्र, सासरच्या त्रासाल कंटाळून जीव देण्यापर्यंत टोकाचं पाऊस भागवतने का उचललं, याचाही तपास पोलीस करत आहेत. तसेच या घटनेने कुटुंबातील हुंडाबळी, मानसिक त्रास आणि विवाहानंतरच्या छळाच्या गंभीर समस्येकडे पुन्हा एकदा लक्ष वेधले आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!