Latest Marathi News
Ganesh J GIF

पुन्हा ट्विस्ट! डान्सर पूजा आणि गोविंद बर्गे प्रकरणात ‘एस’ ची एन्ट्री

पुजाचा पाय आणखी खोलात, पूजाच्या गळ्यात मंगळसूत्र आणि वारंवार 'एस'चा;उल्लेख, आत्महत्या प्रकरणात धक्कादायक खुलासा

बार्शी – बीड जिल्ह्यातील माजी उपसरपंच गोविंद बर्गे मृत्यू प्रकरणी अटकेत असलेली सोलापूर येथील कला केंद्रातील नर्तिका पूजा गायकवाड हिच्या पोलीस कोठडीत दोन दिवसांची वाढ करण्यात आली आहे. पण या प्रकरणात आणखी एक धक्कादायक खुलासा समोर आला आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे.

पूजा गायकवाड हिला गोविंद बरगे यांनी वैराग येथे सुमारे साडेसात लाख रुपये किमतीचा एक प्लॉट खरेदी करून दिला होता, हे उघड झाले आहे. ज्यावेळी सदर प्लॉटची खरेदी करण्यात आली. त्याची रजिस्टर खरेदीच्या कागद पत्रात गोविंद बरगे यांनी साक्षीदार म्हणून सही केली आहे. यावरून पूजा हिला गोविंद बरगे यांनी प्लॉट, जागा, सोनेनाणे खरेदी करून दिले होते. या नातेवाइकांच्या आरोपात तथ्य आढळून आले आहे. पूजा गायकवाडचे बँक खाते आहे, त्याच्या तपासणीसाठी यातून आर्थिक व्यवहार उघड होतील, असा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केला. बँक स्टेटमेंटवरून पूजा आणि गोविंद बर्गे यांच्यात झालेल्या आर्थिक व्यवहारांची तपासणी केली जाणार आहे. महत्त्वाचे म्हणजे पूजा गायकवाड हिने अजून गोविंद बर्गेसारखं कुणाला फसवलं आहे का? याचाही तपास पोलीस करणार आहेत. गोविंद बर्गे यांनी गोळी झाडून ज्या पिस्तुलीनं आत्महत्या केली, ते पिस्तूल गोविंद बर्गेची नसल्याचं देखील समोर आलं आहे. ती पिस्तुल कोणाची आहे, याचा पोलिस तपास करत आहेत. पूजा गायकवाडला बार्शी कोर्टाने दोन दिवसाची वाढीव पोलीस कोठडी दिली आहे. त्यामुळे पोलीस आता पूजाने किती संपत्ती जमवली? बर्गे यांच्याशी फोनवर काय बोलली? चॅट काय होतं? याची तपासणी करणार आहेत. दोन दिवसात पूजाच्या बँक खात्याशी निगडित आणखी नवे खुलासे समोर येणार आहेत. पूजाच्या एका रीलमध्ये कॅप्शनमध्ये, ‘बस्स तू ही मेरा है ‘S” असं लिहिलं आहे. त्यामुळे चौकशी सुरु असताना पूजा हिच्या आयुष्यातील ‘S’ कोण आहे. याची चर्चा देखील सुरु झाली आहे. तसेच अनेक व्हिडीओंमध्ये पूजा हिने गळ्यात मंगळसूत्र देखील घातले आहे. ज्यामुळे पूजा हिच्या गळातील मंगळसूत्र कोणाच्या नावाचं आहे, असा प्रश्न देखील उपस्थित केला जात आहे. त्यामुळे हे प्रकरण अधिकच गुंतागुंतीचे होत आहे.

पूजा गायकवाड ही कला केंद्रात नर्तिका असून ती २१ वर्षांची आहे. दीड वर्षांपूर्वी गोविंद बर्गे आणि पूजा गायकवाड यांची ओळख झाली होती. कालांतराने पूजा गायकवाड आणि गोविंद बर्गे यांच्या प्रेमसंबंध निर्माण झाले. आणि याच प्रेमसंबधात तणाव निर्माण झाल्याने उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आत्महत्या केली.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!