
दोन मैत्रिणींचा एकाच बाॅयफ्रेंडवरून जोरदार वाद आणि..
मैत्रिणीनं मुलाच्या मदतीने महिला होमगार्डचा गळा दाबून नाल्यात फेकले, अयोध्यासोबत नेमके काय घडले?
बीड- गेल्या काही महिन्यांमध्ये बीड जिल्हा गुन्हेगारीच्या मोठ्या घटनांमुळे चर्चेत आला आहे. आता पुन्हा एकदा बीडमध्ये एका प्रेम प्रकरणातून होमगार्ड महिलेला संपवण्यात आल्याची घटना समोर आली आहे.
बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणापासून जिल्ह्यातील गुन्हेगारीच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. अशातच आणखी दोन खुनांच्या घटनाने जिल्हा हादरला आहे. बीडमध्ये एका प्रेम प्रकरणातून होमगार्ड महिलेला संपवण्यात आल्याची घटना समोर आली आहे. बॉयफ्रेंडवरून दोन मैत्रिणींमध्ये वाद निर्माण झाला आणि त्यातूनच एका महिलेचा गळा दाबून खून करण्यात आला. मृत महिलेचा मृतदेह नाल्यात फेकल्याची घटना उघडकीस आली. या प्रकरणी पोलिसांनी मैत्रिणीसह चार जणांना अटक केली आहे. मृत महिलेचे नाव अयोध्या राहुल व्हरकटे असे आहे. चार वर्षांपूर्वी तिच्या पतीचा अपघातात मृत्यू झाला होता. तिला तीन वर्षांची मुलगी असून ती सध्या सासरी आहे. अयोध्या काही महिन्यांपूर्वी होमगार्डमध्ये भरती झाली होती आणि बीड शहरातील अंबिका चौक परिसरात राहून पोलिस भरतीची तयारी करत होती. तर दुसरीकडे अयोध्याची मैत्रीण फडताडे हिचे राठोड नावाच्या युवकासोबत प्रेमसंबंध होते. मात्र काही दिवसांपूर्वी राठोडची जवळीक अयोध्याशी वाढली. यामुळे फडताडे हिच्या मनात तीव्र राग निर्माण झाला. घटनेच्या दिवशी फडताडे हिने अयोध्याला घरी बोलावून घेतले आणि तिचा गळा दाबून हत्या केली. त्यानंतर मध्यरात्री मृतदेह एका खोक्यात ठेवून बीड शहरापासून जवळपास पाच किलोमीटर अंतरावर झाडीत असलेल्या नाल्यात फेकला. अयोध्या बेपत्ता असल्याची तक्रार तिच्या नातेवाईकांनी दिली होती. होमगार्ड बेपत्ता झाल्याने, पोलिसांनी देखील त्यांच्या शोध सुरू केला. गुरुवारी सकाळी हा मृतदेह आढळून आला आणि घटनेची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी चौघांना ताब्यात घेतले आहे. अयोध्याचा मृतदेह उत्तरीय तपासणी झाली आहे. महिला होमगार्ड हत्येनं बीड पोलिस दलासह होमगार्डमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी तपासात वृंदावनी खरमाडे या महिलेला ताब्यात घेतलं आहे. पोलिसांच्या तपासात अयोध्या आणि संशयित वृंदावनी महिला एकाच गावच्या रहिवासी असल्याचे समोर आले आहे. या घटनेमागे हत्येचा संशय व्यक्त करण्यात येतं असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.