
पुणे शहरात घरफोडी करणाऱ्या दोन व्यसनाधीन चोरट्यांना विश्रामबाग पोलिसांनी अटक केली आहे .अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून विश्रामबाग पोलीस ठाण्यातील एक गुन्हा उघडकीस आला आहे. रवी जितेंद्र सरोदे (वय-47 रा. धानोरी, लोहगाव सध्या रा. गणेश पेठ, पुणे), प्रीतम नंदू आवतारे (वय-24 रा. चिंचवड सध्या रा. गणेश पेठ पुणे) असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.मेडीकल दुकानाचे शटर उचकटून 13 हजार 800 रुपयांची चोरी केल्याप्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात आयपीसी 457, 454, 380, 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दाखल गुन्ह्याचा तपास करुन तपास पथकाला रवी सरोदे व प्रीतम अवतारे यांनी गुन्हा केल्याचे निष्पन्न केले. आरोपी फिरस्ते व व्यसनी असल्याने शोध घेणे कठीण होते. अखेर पोलिसांनी आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विशाल पाटील करी आहेत.
ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहायक पोलीस आयुक्त प्रवीण पवार, अपर पोलीस आयुक्त प्रवीणकुमार पाटील,पोलीस उपायुक्त संदिप सिंह गिल्ल, सहायक पोलीस आयुक्त साईनाथ ठोंबरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिपाली भुजबळ,पोलीस निरीक्षक गुन्हे अरुण घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मनोज बरुरे, पोलीस अंमलदार राकेश गुजर,रेवन कंचे, अशोक माने, मयुर भोसले, गणेश काठे, महावीर वलट, आशिष खरात, राहुल मोरे, साताप्पा पाटील, संतोष शेरखाने,अर्जुन थोरात आणि नितीन बाबर यांच्या पथकाने केली आहे.