यमुनानगर – हरियाणातातील यमुनानगरमध्ये सकाळी गोळीबार करण्यात आला आहे. यामध्ये दोन तरूणांचा मृत्यू झाला असून एकजण जखमी झाला आहे. या हल्ल्याचा थरार सीसीटीव्हीत कैद झाला आहे.
यमुनानगरमधील एका जीमबाहेर ही घटना घडली आहे. तीन तरुण जीम संपवून बाहेर आल्यानंतर गाडीतून आलेल्या चार ते पाच तरूणांनी त्यांच्यावर गोळीबार केला. यात दोन तरुण जागीच ठार झाले. तर तिसरा तरुण गंभीर जखमी झाला असून त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हत्येचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना मिळाले आहे. त्याआधारे पुढील तपास करण्यात येत आहे.
गोळीबारामागचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. प्राथमिक तपासानुसार एकमेकांच्या वैमनस्यातून ही घटना घडली असल्याची शक्यता आहे.