Latest Marathi News
Ganesh J GIF

दोन महिलांची मेट्रोत एकमेकींच्या झिंज्या ओढत हाणामारी

तुफान हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल, मेट्रो बनली फायटिंग रिंग, कशामुळे झाली हाणामारी?

दिल्ली – अनेकजण कामाला जाण्यासाठी लोकल किंवा मेट्रोसारख्या साधनांचा वापर करतात. पण कधी कधी हा ठिकाणी अनेकांना वेगवेगळे अनुभव येत असतात. सध्या दिल्लीकरांची मेट्रो पुन्हा एकदा सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे चर्चेत आली आहे.

व्हायरल व्हिडिओत दिसत आहे की, मेट्रो पूर्णपणे मोकळी दिसत आहे. यामध्ये दोन महिलां एकमेकांनी सीटवर लोळवत आहेत, एकमेकींची केस उपटत आहेत. एकमेकांना मारत आहेत. दोघींमध्ये घमासान युद्ध सुरु आहे. भांडणाचे कारण अद्याप कळालेले नाही. मेट्रो मोकळी असल्यामुळे सीटवरुन वाद अशक्य आहे. पण सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे. यावर अनेकांनी मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहे. एका युजरने हे रोजचेचे आहे असे म्हटले आहे, तर दुसऱ्या एका युजरने दोघी एकमेकींचा जीव घेतल्याशिवाय ऐकणार नाहीत असे म्हटले आहे. तिसऱ्या एकाने दिल्ली मेट्रोमध्ये रोज मनोरंजन होते, ज्यांकडे टीव्ही नाही त्यांनी इथेच येऊन बसावे असे म्हटले आहे.

 

अलीकडे असे भांडणाचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर सतत व्हायरल होत असतात. कधी बसमध्ये, कधी मेट्रोमध्ये तर कधी भर रस्त्यात लोकांची भांडणे सुरु असतात. मुंबई लोकलमध्ये तर नेहमीच भांडणे होत असतात.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!