
अनोख्या लग्नाचा व्हिडीओ सोशल मिडीयावर तुफान व्हायरल
नवरदेवाने वेधले लक्ष, नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया, पहा अनोख्या लग्नाचा अनोखा व्हिडीओ
लगीनसराईच्या दिवसात सोशल मीडियावर अनेक लग्नांचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. लग्नात अलिकडे अनेकजण काहीतरी हटके करत स्वतःकडे लक्ष खेचून घेत असतात. पण सध्या सोशल मिडीयावर एक व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे.
सध्या इन्स्टाग्रामवर एका ७० वर्षीय चाचांचा लग्नाचा व्हिडीओ चांगलाच गाजत आहेत. सध्याच्या घडीला अनेक तरुण मुलांची लग्न होत नाही आहेत. तर दुसरीकडे आजोबाच्या वयाच्या व्यक्ती तरुण मुलींशी लग्न करत आहेत. सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओत दिसत आहे की, ७० वर्षाचे नवरदेव नवरीला लग्नाचा हार घालताना दिसत आहे. विशेष म्हणजे हे आजोबा नवरी पेक्षा खुपच मोठे आहेत. सोशल मिडीयावर हे आजोबा चाचा म्हणून फेमस झाले आहेत. नवरी त्यांच्या मुलीच्या वयापेक्षाही लहान असल्याचे दिसत आहे. चाचा या लग्नामुळे अतिशय खूश झालेले दिसत असून फोटोशूट दरम्यान ते पोजही देत आहेत. कमाल म्हणजे
या लग्नात नवरी देखील आनंदी दिसत आहे. ती देखील हसत सर्वांच्या शुभेच्छा स्विकारण्याबरोबर फोटोसाठी वेगवेगळ्या पोज देत आहे. @zindagi.gulzar.h या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओवर अनेक लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.
या व्हिडिओवर अनेकांनी तरूण मुलांची लग्न होत नसताना आजोबा मात्र मजा करत आहेत, अशी प्रतिक्रिया दिली आहे. तर लग्नावरुन विश्वास उडाल्याचे सांगितले आहे. पण सर्वांनी नवरीच्या साैंदर्याचे काैतुक केले आहे.